आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अभियांत्रिकीच्या एकाच सीईटीचा निर्णय स्थगित, मनुष्‍यबळ विकास मंत्रालयाचा निर्णय

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- अभियांत्रिकी प्रवेशासाठी देशात एकच समायिक प्रवेश परीक्षा घेण्याची योजना मनुष्यबळ विकास मंत्रालयाने तूर्त स्थगित ठेवली. यासंबंधी काही मुद्द्यांवर राज्या-राज्यांत मतभिन्नता आहे. यावर एकमत होईपर्यंत निर्णय लागू केला जाऊ नये, अशी मंत्रालयाची भूमिका आहे. ऑल इंडिया कौन्सिल ऑफ टेक्निकल एज्युकेशनने पुढील शैक्षणिक वर्षापासून देशभर अभियांत्रिकी अभ्यासक्रमासाठी एकच प्रवेश परीक्षा घेण्याचे निश्चित केले होते. याला प. बंगाल व तामिळनाडूचा विरोध होता.
 
2018 पासून देशभरात इंजिनिअरिंग प्रवेशासाठी एकच सीईटी घेण्‍यात येईल, अशी घोषणा अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने मार्चमध्‍ये केली होती. मात्र पश्चिम बंगाल आणि तामिळनाडू सरकारने याला विरोध केला होता. त्‍यामुळे मनुष्‍यबळ विकास मंत्रालयाने तुर्तास या निर्णयाला स्‍थगिती दिली आहे.
 
'याप्रकरणी सर्व राज्यांशी चर्चा होणे आवश्यक आहे. सर्व राज्‍यांचे एकमत झाले तरच या निर्णयाची अमंलबजावणी करता येणे शक्‍य होणार आहे', असे मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्‍या अधिकार्‍याने सांगितले.
बातम्या आणखी आहेत...