आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

चारचाकी रिक्षा सफरीचा आता लुटा आनंद, सरकार परवानगी देणार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - दिसायला छोट्या कारसारखा आकार असलेल्या चारचाकी रिक्षा लवकरच सुरू होत आहेत. अशा वाहनांना परवानगी देण्याचे संकेत सरकारने दिले असून लवकरच त्यासाठी अधिसूचना जारी होण्याची शक्यता आहे. 1 ऑक्टोबरपासून या रिक्षा सुरू होऊ शकतील. दरम्यान, या वाहनांना केवळ व्यावसायिक वापरासाठीच परवाने दिले जाण्याचा प्रस्ताव आहे.

केंद्रीय परिवहन आणि रस्ते विकास मंत्रालयाने काही दिवसांपूर्वी हा निर्णय घेतला. अधिसूचनेनंतर नव्या वाहनाबद्दलचा तपशील अर्थात इंजिनची क्षमता, वेग याबद्दल माहिती दिली जाणार असल्याचे तेव्हा सांगण्यात आले. ही अधिसूचना आता तयार करण्यात आली आहे.

या वाहनाचा (क्वाड्रिसायकल) कमाल वेग ताशी 70 किमी ठरवण्यात आल्याचे एका अधिकार्‍याने सांगितले. पेट्रोलवर चालणार्‍या इंजिनची क्षमता 200 सीसी तर मायलेज 35 किमी असेल. ही वाहने सुधारित असून कारप्रमाणे पूर्णपणे बंद असतील. प्रवासी व चालकासाठी वेगवेगळे दरवाजे व स्टिअरिंगमुळे चालवतानाच कारसारखा अनुभव देईल.


नवीन अनुभव
बजाजची आरई क्वाड्रिसायकल

बजाजची कार आर ई 60 ही क्वाड्रिसायकल र्शेणीतील आहे. या गाडीचे उत्पादन औरंगाबाद येथील प्लांटमध्ये सुरू आहे. टाटाच्या नॅनो कारसारख्या दिसणार्‍या या रिक्षावर पुढे व मागे मोठय़ा अक्षरांत (किमान 125 चौरस सेंटिमीटर) ‘क्यू’ हे इंग्रजी अक्षर लिहिणे गरजेचे असेल. वाहन क्वाड्रिसायकल र्शेणीतील आहे हे दुरून ओळखू यावे म्हणून ते लिहावे लागेल.
0ताशी 70 किमी वेगाने धावेल गाडी
0रिक्षात कारच्या प्रवासाचा आनंद
0एका रिक्षात चौघांना प्रवासाची मान्यता
0सुरुवातीला केवळ व्यावसायिक वापर