आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

देशभरातील विद्यापीठांमध्ये 2019 पासून एंट्रन्सनेच प्रवेश; कॉपीबहाद्दर विद्यार्थ्यांना बसणार चाप

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- २०१९-२० या शैक्षणिक वर्षापासून देशभरातील विद्यापीठांत प्रवेशपूर्व परीक्षेनंतर विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाईल. या परीक्षेची मार्गदर्शक तत्त्वे िनश्चित करावीत, असे निर्देश यूजीसीला देण्यात आले आहेत. मनुष्यबळ विकास राज्यमंत्री डॉ. सत्यपालसिंह यांनी ही माहिती दिली.


अशा प्रवेशपूर्व परीक्षेमुळे विद्यार्थ्यांना कटऑफच्या तणावातून मुक्ती मिळेल आणि कॉप्य करणारे विद्यार्थी हुशार विद्यार्थ्यांपेक्षा पुढे जाऊ शकणार नाहीत. पेपर फोडून किंवा अन्य मार्गाने आपले गुण वाढवणे गैरच आहे. म्हणूनच विद्यापीठांत प्रवेशासाठी अशा प्रवेशपूर्व परीक्षेची गरज निर्माण झाली असल्याचे डॉ. सिंह म्हणाले.


दोन वर्षांपूर्वीच विद्यापीठांना अशी प्रवेशपूर्व परीक्षा पद्धती लागू करण्याचे निर्देश दिले होतो. मात्र, तेव्हा संगणकांचे साॅफ्टवेअर िकंवा सर्व्हर अपडेट नव्हते. आता ५०-५५ टक्के गुण असलेल्या विद्यार्थ्यांनाही प्रवेशपूर्व परीक्षेला बसता यावे, हे सरकारचे धोरण आहे.

 

सध्या व्यावसायिक काेर्ससाठीच एंट्रन्स
- सध्या केवळ इंजिनिअरिंग व वैद्यकीयसारख्या व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठीव प्रवेशपूर्व परीक्षा घेतली जाते.

- इतर अभ्यासक्रमांसाठी कटऑफ पद्धतीने प्रवेश दिले जातात.

बातम्या आणखी आहेत...