आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Environment Ministry Give Permission For Shivaji Maharaj Memorial In Arabi Sea

शिवस्मारकावर शिक्कामोर्तब, अरबी समुद्रात उभारणीला पर्यावरण मंत्रालयाची मंजुरी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - मुंबईच्या अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य स्मारक उभारणीस केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने गुरुवारी परवानगी दिली. या संदर्भातील अधिसूचना लवकरच काढण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी पत्रकारांना दिली. अरबी समुद्रात शिवाजी महाराजांचे भव्य स्मारक उभारण्याचा मुद्दा मार्गी लागला असल्याचे जावडेकर म्हणाले. काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी सरकारने शिवरायांचे स्मारक उभारण्याची घोषणा २००४ मध्ये केली होती. त्यासाठी १०० कोटी रुपयांची तरतूदही करण्यात आली होती. मात्र त्याला पर्यावरण मंत्रालयाची मंजुरी मिळाली नसल्यामुळे हा प्रकल्प
लोंबकळत पडला होता.

‘स्टॅच्यू ऑफ लिबर्टी’ धर्तीवर उभारणी : हे स्मारक अमेरिकेतील स्टॅच्यू ऑफ लिबर्टी व कन्याकुमारीतील स्वामी विवेकानंद स्मारकाच्या धर्तीवर उभारले जाईल.
- मरीन ड्राइव्हजवळ खोल अरबी समुद्रात नौदल तळासमोर शिवस्मारक उभारणीची योजना आहे.'

309 फूट उंचीचे भव्य दिव्य स्मारक
100 कोटी रुपयांची तरतूद
2004 मध्ये आघाडी सरकारने केली होती स्मारक उभारणीची घोषणा