आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तुमच्याकडे Aadhaar-UAN असेल तर ऑनलाइन काढू शकतात PF; 4 कोटी सदस्यांना होईल लाभ

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- कर्मचारी भविष्य निर्वाह संघटनेच्या (ईपीएफओ) सदस्यांना खूषखबर आहे. ती म्हणजे ते त्यांना आता ऑनलाइन प्रॉव्हिडेंट फंड काढता येणार आहे. ईपीएफओने पीएफ काढणे तसेच अॅडव्हान्स घेण्यासाठी ऑनलाइन क्लेम फाइल करण्याची सुविधा सुरु केली आहे. या सुविधेचा लाभ ईपीएफओच्या जवळपास 4 कोटी सदस्यांना होईल. मात्र, या सुविधेचा लाभ घेण्यासाठी आपल्याकडे आधार आणि यूएएन ( युनिव्हर्सल अकाऊंट नंबर) असणे गरजेचे आहे.
 
यूनिफाइड पोर्टलवर फाइल करू शकता क्लेम...
- ईपीएफओच्या सदस्यांना पीएफ तसेच पीएफमधून अॅडव्हान्स पैसे काढण्यासाठी आता यूनीफाइड पोर्टलवर ऑनलाइन क्‍लेम फाइल करता येईल. ईपीएफओने यूनीफाइड पोर्टलवर एक नवी सुविधा सुरु केली आहे.
- ईपीएफओचे एकूण सदस्य संख्या  15 कोटी आहेत. त्यापैकी 4 कोटी सदस्य सक्रीय आहेत. या नव्या सुविधेचा त्यांना लाभ मिळेल.
बातम्या आणखी आहेत...