आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पेन्शनसाठी खेटे घालायची गरज नाही, ईपीएफओचा नवा फॉर्म

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - आता पेन्शनसाठी कंपनीत चकरा मारण्याची गरज नाही. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (ईपीएफओ) अंशधारकांसाठी सरल युनिव्हर्सल अकाउंट नंबर (यूएनए) आधारित क्लेम फॉर्म डी-१० जारी केला आहे. तो भरून थेट ईपीएफओला पाठवता येईल. नंतर पेन्शन निश्चित होईल. फॉर्म कंपनीकडून अटेस्टेड करण्याचीही गरज नाही. सध्या कर्मचाऱ्यांना पेन्शनसाठी दावा अर्ज कंपनीकडून अटेस्टेड करावा लागतो. यानंतर निवृत्तीपश्चात किती पेन्शन मिळेल हे ठरते. दुसरीकडे, वयाच्या ५८ वर्षांनंतर पुढील दोन वर्षे पेन्शन न उचलणाऱ्यांना ८.६ टक्के जास्त पेन्शनचाही पर्याय ईपीएफओने उपलब्ध करून दिला अाहे.
बातम्या आणखी आहेत...