आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भविष्य निर्वाह निधीचा व्याजदर जैसे थे, इपीएफओच्या बैठकीत झाला निर्णय

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - कर्मचारी भविष्य निधी संघटनेने (इपीएफओ) भविष्य निर्वाह निधीवरील (पीएफ) व्याजदर 8.75 ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. इपीएफओच्या संचालक मंडळाच्या मंगळवारी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
केंद्रीय भविष्य निधी आयुक्त के. के. जालान यांनी ही माहिती दिली. या निर्णयाचा लाभ पाच कोटी पीएफ खातेधारकांना होणार आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार श्रमिक संघाच्या विरोधानंतर व्याजदर जैसे थे ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयाची अंमलबजवाणी अर्थमंत्रालय अधिसुचना जारी करुन करेल.