आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

किमान मासिक पेन्शन योजना बंद, ईपीएफओने उचलले पाऊल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - ईपीएफओ या निवृत्ती निधी संस्थेने १,००० रुपये किमान मासिक निवृत्तिवेतन योजना या महिन्यापासून स्थगित केली आहे. ३२ लाख निवृत्तिवेतनधारकांना या निर्णयाचा फटका बसणार आहे.

या योजनेअंतर्गत एक हजार रुपयांपेक्षा कमी निवृत्तिवेतन मिळणार्‍यांच्या रकमेत वाढ करून सप्टेंबर २०१४ पासून किमान निवृत्तिवेतन १००० रुपये करण्यात आले होते. योजनाच स्थगित झाल्यामुळे लाभार्थींना जुन्याच दराने निवृत्तिवेतन मिळेल. ३१ मार्चनंतर ही योजना चालू ठेवण्याबाबत सरकारकडून कोणतेही निर्देश न मिळाल्यामुळे योजना स्थगितीचा निर्णय घेण्यात आल्याचे कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने(ईपीएफओ) आपल्या क्षेत्रीय कार्यालयांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे.

केंद्र सरकारने १९ ऑगस्ट २०१४ रोजी जारी केलेल्या अधिसूचनेनुसार किमान निवृत्तिवेतन योजनेचा कालावधी १ सप्टेंबर २०१४ पासून ३१ मार्च २०१५ पर्यंत होता.