आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

EPFO सदस्यांसाठी खूशखबर! 10 लाख पीएफधारकांना मिळणार हक्काचे घर, हडको देणार सूट

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ईपीएफओ सदस्य या योजनेनुसार, ही घरे खरेदी करू शकतील. (फाईल) - Divya Marathi
ईपीएफओ सदस्य या योजनेनुसार, ही घरे खरेदी करू शकतील. (फाईल)
नवी दिल्ली - येत्या दोन वर्षांत कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (ईपीएफओ) घरकूल योजनेअंतर्गत 10 लाख घरे बांधली जाणार आहेत. ईपीएफओ सदस्य या योजनेनुसार, ही घरे खरेदी करू शकतील. यासोबतच, ईपीएफओ मेंबर्सना घरेदी खरेदी करण्यासाठी लागणाऱ्या लोनमध्ये हाऊसिंग अॅन्ड अर्बन डेव्हलपमेंट (हडको) 2.20 लाखांपर्यंतची सूट उपलब्ध करून देणार आहे. 
 
ईपीएफओ आणि हडकोमध्ये करार
- ईपीएफओचे केंद्रीय पीएफ आयुक्त डॉ. व्ही.पी. जॉय यांनी दिलेल्या माहितीनुसार, ईपीएफओ एक हाऊसिंग को-ऑपरेटिव्ह सोसायटी बनवणार आहे. येत्या 2 वर्षांत बिल्डर्सच्या मदतीने देशभर ही सोसायटी 10 लाख घरे उभारणार आहे. 
- यासाठी ईपीएफओ हडकोसोबत एक करार करणार आहे. यात हडको पंतप्रधान घरकूल योजनेनुसार, गृहकर्जात सूट उपलब्ध करून देणार आहे. ही सूट 2 लाख 20 हजार रुपयांपर्यंत राहील. 
- सब्सिडीचा लाभ घेण्यासाठी ईपीएफओ मेंबर सरकारी बँक, खासगी बँक, सहकारी बँक आणि हाऊसिंग फायनान्स कंपन्यांकडून सुद्धा लोन घेऊ शकतील.
 
PF मधून काढता येणार 90 टक्के रक्कम
- ईपीएफओ मेंबर्स घर खरेदी करण्यासाठी आपल्या पीएफमधून 90 टक्के रक्कम काढू शकणार आहेत. 
- यासाठी पीएफ अॅक्ट 1952 मध्ये सुधारणा करण्यात आली आहे. 90 टक्के रक्कम काढण्यासाठी पीएफ मेंबरचे खाते किमान 3 वर्ष पूर्ण झालेले असणे बंधनकारक आहे. 
 
EMI साठी पैसे नसल्यास खातेधारकाची जबाबदारी
यासोबतच महत्वाचे म्हणजे, कर्ज बुडवल्यास ईपीएफओ याची जबाबदारी घेणार नाही. एखाद्या वेळी पीएफ खात्यामध्ये ईएमआय भरण्यासाठी पैसाच नसेल तर त्याची सर्वस्वी जबाबदारी त्या खातेधारकाची राहील. ईपीएफओने ही स्कीम काढण्याचा हेतू स्वस्त आणि परडणाऱ्या घरांच्या खरेदीला प्रोत्साहन देणे असा आहे.
 
बातम्या आणखी आहेत...