आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Equipment Invented Which Give Information Before Earthquake

भूकंपाची सूचना ३० सेकंद आधी देणारे उपकरण, १८ व १९ जानेवारीला चाचणी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - जर्मनीतील संस्था सेंटर फॉर जियोसायन्सेसच्या (जीएफझेड) सहकार्याने एक कंपनीने नवीन उपकरण तयार केले आहे. हे उपकरण भूकंप येणार असेल तर ३० सेकंद आधी त्याचा इशारा देऊ शकेल. त्याचा उपयोग लोकांना सुरक्षित ठिकाणी पोहोचण्यासाठी होऊ शकेल.
सध्या प्रायोगिक तत्वावर हे उपकरण २० ते २५ देशांत बसवण्यात आले आहे. पुढील आठवड्यात बंगळुरू येथील सेंट्रल पॉवर रिसर्च इन्स्टि्यूटू ऑफ शेकिंग टेबलावर या उपकरणाची चाचणी घेण्यात येणार आहे. पायलट प्रोजेक्टच्या रुपात चंदिगढच्या हरियाणा लघु सचिवालयात हे उपकरण व इतर प्रायोगिक प्रणाली बसवली जाण्याची शक्यता आहे.

उपकरण तयार करणाऱ्या कंपनीचे प्रमुख बिजेंद्र गोयल यांनी सांगितले की, १२ जानेवारी रोजी हे उपकरण विकसित करणारे शास्त्रज्ञ झुएरजेन पर्जाइलेक यांनी दिल्लीत या उपकरणाची माहिती सादर केली. आता १८ व १९ जानेवारी रोजी बंगळुरूमध्ये त्याची चाचणी करण्यात येणार आहे. त्यावर २०० ते ३०० किलोमीटरच्या क्षेत्रात पाच किंवा त्यापेक्षा जास्त रिश्टर स्केलचा भूकंप झाल्यास जास्तीत जास्त ३० सेकंद आधी लोकांना सायरन वाजवून त्याचा इशारा देईल. या शिवाय लिफ्ट, गॅस, वीज व पाणी पुरवठा बंद करेल. भूकंपाच्या लहरी ३ किलोमीटर प्रतिसेकंद वेगाने पुढे जातात. तर या उपकरणातील लहरी जवळपास साडेपाच किलोमीटर वेगाने पुढे जातात. त्याचा सूक्ष्म अभ्यास करुन हे उपकरण त्याचा इशारा जारी करते. ते उपकरण मोठ्या इमारती उभारताना त्याच्या पायामध्ये बसवता येऊ शकते. जेणे करून त्यामुळे लोकांना आयत्यावेळी जीव वाचवता येऊ शकेल. या उपकरणाचा उपयोग नुकसान कमी करण्यासाठी होईल.

संवेदनशीलतेची स्थिती
भारताचा ६० टक्के भूभाग हा भूकंपाच्या दृष्टिकोनातून संवेदनशील समजला जातो. विशेषत: राजधानी दिल्ली. येथे ७ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप येऊ शकतो. दिल्लीच्या खालून तीन फॉल्ट लाइन जाते. सोहन फॉल्ट लाइन, मुरादाबाद फॉल्ट लाइन व मथुरा फॉल्ट लाइन. त्यामुळे या परिसराला भूकंपाचा धोका आहे.

तैवानच्या मदतीने संशोधन सुरू
भूकंपाची भविष्यवाणी करणारी कोणतीही प्रणाली आज अस्तित्वात नाही. जर्मनीतील जियाे रिसर्च सेंटरमध्ये गेल्या १०० वर्षांमधील भूकंपाचा डाटा उपलब्ध आहे. जपानने सर्वात आधी भूकंपाची पूर्वसूचना देणारे तंत्रज्ञान विकसित केले आहे. त्यानंतर तैवानने हे तंत्रज्ञान आणले. तैवानच्या मदतीने आयआयटी रुडकीमध्येही गेल्या काही वर्षांपासून भूकंपाची पूर्वसूचना देणाऱ्या उपकरणावर काम सुरू आहे. देशात तीन शेकींग टेबलअसून त्यापैकी आयआयटी रुडकी येथील शेकिंग टेबल सध्या खराब आहे. बंगळुरू येथील संस्थेजवळदेखील भूकंपाचा प्राथमिक डाटा उपलब्ध नाही. तिसरा शेकिंग टेबल चेन्नई येथील सीएसआयआरमध्ये आहे.