नवी दिल्ली - तुम्ही महिला असाल आणि सोशल साइट्वर असाल तर सावधान.
फेसबुकवर अशा काही प्रोफाइल्स अॅक्टिव्ह आहेत, जे महिला आणि तरुणींचे फोटो चोरून पोर्न साइट्सवर अपलोड करत आहेत. भारतातील केरळमधील एका एथिकल हॅकर्स ग्रुपने याचा छडा लावला आहे. भारतातील सोशल मीडियावर अॅक्टिव्ह महिलांपैकी 40 टक्के महिलांना अशा प्रकाराचा सामना करावा लागला आहे. हे रॅकेट फार मोठे असण्याची शक्यता आहे.
70 फेसबुक प्रोफाइल्स घेत आहेत सुंदर तरुणींचा शोध
- मेल टुडेच्या वृत्तानुसार, केरळमधील सायबर वॉरियर्स ग्रुपच्या 15 एथिकल हॅकर्सच्या टीमने 28 डिसेंबरपासून आतापर्यंत 70 फेसबुक प्रोफाइल्स हॅक करुन त्यांचा पर्दाफाश केला आहे.
- महिला आणि तरुणींच्या फेसबुक अल्बमचे फोटो कॉपी करुन त्यांना मॉर्फ करण्याचे काम याच 70 प्रोफाइल्सच्या माध्यमातून होत आहे.
- तरुणींचे फोटो चोरून त्यांना पोर्न साइट्सच्या अॅडमिनिस्ट्रेटरला पाठवले जात आहे. पोर्न साइट्स या फोटोंशी छेडछाड करुन त्यांना पोर्न साइटवर अपलोड करत आहेत.
- एथिकल हॅकर्स ग्रुने अशा काही प्रोफाइल हॅक केल्या आहेत, ज्या तरुणींशी सेक्स चॅट करुन त्यांना गंडा घालत होत्या.
- गेल्या महिन्यात करेळमध्ये एक मॉडेल आणि तिच्या पतीला ऑनलाइन सेक्स रॅकेट चालवण्याच्या आरोपात अटक झाली होती, त्यानंतर सायबर वॉरियर्स ग्रुप अॅक्टीव्ह झाला आणि त्याने महिलांच्या फोटोची चोरी करणाऱ्या 70 प्रोफाइल्सचा छडा लावला.
पोलिस कारवाई पुरेशी नाही
- एका एथिकल हॅकरने सांगितले, की महिलांच्या फोटोंचा गैरवापर होत असल्याच्या पोलिसांकडे अनेक तक्रारी येत असतात.
- सर्वच प्रकरणात पोलिस कारवाई करु शकत नाहीत, अशी परिस्थिती आहे. त्यामुळे एथिकल हॅकर्स ग्रुपने आपली सामाजिक जबाबदारी समजून याविरोधात अॅक्शन सुरु केली.
पुढील स्लाइडमध्ये,
>> भारतीय महिलाच का होत आहे शिकार?
>> कसा कराल स्वतःचा बचाव