आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोदी@3: 25% मराठी माणसाने मोदींना दिले 10 पैकी 10 गुण, PM या मुद्द्यांवर राहातात गप्प

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
महाराष्ट्र दौऱ्यावर असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी (फाइल फोटो). - Divya Marathi
महाराष्ट्र दौऱ्यावर असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी (फाइल फोटो).
मुंबई- केंद्रातील मोदी सरकारला आज 3 वर्षे पूर्ण झाली. सरकारच्या चांगल्या-वाईट निर्णयांचा आपल्यावर काय परिणाम झाला, हे जाणून घेण्यासाठी भास्कर समूहाने सर्वात मोठे सर्वेक्षण केले आहे. या सर्वेक्षणात महाराष्ट्रासह राजस्थान, गुजरात, हरियाणा, बिहार, उत्तराखंड, कर्नाटक आणि बंगालमधील 25 टक्क्यांपेक्षा जास्त लोकांनी मोदींना दहा पैकी दहा गुण दिले आहेत.

सर्व्हेक्षणातून अनेक आश्चर्यकारक तथ्थे समोर आली आहेत. मोदी हे युवकांचे आवडते नेते म्हणून ओळखले जात होते. पण, नव्या तथ्यांनी ही धारणा बदलून टाकली आहे. ते युवकांसो महिला आणि ज्येष्ठ नागरिकांमध्ये तितकेच लोकप्रिय आहेत.

आकडेवारीच्या दृष्टीकोणातून बघितले तर लक्षात येईल की सर्व्हेतील 70 टक्के महिलांनी मोदींना  6 किंवा त्यापेक्षा अधिक गुण दिले आहेत. तर, 77 टक्के ज्येष्ठ नागरिकही मोदींचे निर्णय आणि कामकाजासोबत आहेत. ही स्थिती मोदींच्या बाजूंनी जाण्याचे कारण म्हणजे आगामी काळात ज्या दहा राज्यांमध्ये निवडणुका होणार आहेत त्या राज्यांतील 79 टक्के लोकांनीही मोदींना 10 पैकी 6 गुण दिले आहेत. शहरापेक्षा ग्रामीण भागातील  लोक नोटाबंदीचे समर्थन करत आहेत. आकडेवारीवरून हेच दिसून येते. आताच्या घडीला निवडणुका झाल्यास मोदी 2014 पेक्षाही अधिक जागांनी जिंकतील,  असे तथ्य समोर आले आहे. ज्यांनी सरकारला महागाई, भ्रष्टाचार आणि महिला सुरक्षेच्या मुद्द्यावरून अपयशी ठरवले त्यांनीच समग्र कामकाजाबाबत चांगले गुण दिले आहेत.

महाराष्ट्रासह देशातील काही राज्यांत सर्जिकल स्ट्राइक चर्चेचा मुद्दा ठरला आहे. तर दक्षिणेत आधार कार्डचा मुद्दा अग्रभागी राहिला आहे. त्याचप्रमाणे रेल्वेतील लवचिक भाडे पद्धतीलाही दुसर्‍या क्रमांकाची पसंती दिली आहे.
 
भास्कर सर्वेक्षणातील एक प्रश्न मोदींच्या संवाद साधण्याच्या शैलीवर आधारित होता.
राममंदिर, कत्तलखाने आणि दलितांशी संबंधित मुद्द्यांवर मोदी गप्प राहातात, असे 61 टक्के लोकांचे म्हणणे आहे. उत्तर प्रदेशच्या बहुतांश लोकांच्या मते, वादग्रस्त मुद्द्यांवर मोदी नेहमीच गप्प असतात.

पुढील स्लाइडवर वाचा... मोदींना सर्वाधिक पाठिंबा कुटून...
 
हेही वाचा...
> मोदी@3: 'मेरा भाषण ही मेरा शासन...'बाहुबली ते दंगल'पर्यंतचे 9 डायलॉग्समध्ये मोदींचा अंदाज
> मोदी@3: मोदी सरकारचे 3 पॉइंट अॅनालिसिस: 6 मुद्द्यांवरून जाणून घ्या कसा राहिला परफॉर्मन्स
> मोदी@3: मोदींना आवडते भेंडी-कढी आणि श्रीखंड, हे आहेत त्यांचे फेव्हरेट फूड
> मोदी@3: स्टाईल आयकॉन ते राष्ट्रवादी प्रतिमा..15 फॅक्ट्‍समधून समजून घ्या नरेंद्र मोदींचे व्यक्तिमत्त्व!
> मोदी@3: सोशल मीडियापासून ते ग्राऊंड रिपोर्टपर्यंत.. प्रत्येक पैलुचे विश्लेषण, पोस्टमॉर्टेम..
>मोदी@3: प्रत्येक मुद्द्यावर भरभरून बोलणारे मोदी..राम मंदिर, कत्तलखाने व दलितांच्या मुद्यांवर चिडीचूप
> मोदी@3: VIDEO: शपथ ते जाधव यांच्या फाशीवर स्थगिती, असे राहीले मोदी सरकारचे 3 वर्ष
बातम्या आणखी आहेत...