आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Every Day One Indian Child Adopted By Foreginers

भारतातून दररोज एक बालक विदेशात दत्तक जाते, अनिवासी भारतीय सर्वात पुढे

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - भारतातून दररोज सरासरी एकापेक्षा जास्त बालके विदेशात दत्तक दिल्या जात असून दत्तक घेणा-यांमध्ये अनिवासी भारतीय, भारतीय वंशाचे लोक आणि अन्य नागरिकांचा समावेश आहे. ज्या ठिकाणाहून अशी मुले बेपत्ता झाली आहेत आणि नंतर विदेशात सापडली आहेत अशा प्रकरणात दत्तक देण्यासंबधात अनेक तक्रारी समोर आल्या आहेत.
सेंट्रल अ‍ॅडॉप्शन रिसोर्स अ‍ॅथोरिटी (कारा) ने दिलेल्या आकडेवारीनुसार 2009 ते 2012 दरम्यान अनिवासी भारतीय, भारतीय वंशाचे लोक तसेच अन्य विदेशी नागरिकांना भारतामधून 2090 बालके दत्तक देण्यात आली आहेत. या दरम्यान देश आणि विदेशात दत्तक दिल्या गेलेल्या बालकांची एकुण संख्या 15599 इतकी आहे. 2009 मध्ये विदेशात दत्तक देण्यात आलेल्या बालकांची संख्या 666 इतकी तर 2010 मध्ये ती 593 इतकी होती. 2011 मध्ये 589 तर 2012 मध्ये एप्रिल ते डिसेंबर या दरम्यान 242 बालके विदेशात दत्तक दिली.


भारतात दत्तकत्वाची प्रक्रिया 606 दिवसांची
अमेरिकन विदेश विभागाच्या दत्तक घेण्यासंबंधीच्या 2012 च्या अहवालानुसार, मॅक्सिकोमध्ये दत्तक देण्याची प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी सरासरी 770 दिवसांचा कालावधी लागतो तर डोमेनिकन रिपब्लिकमध्ये या 741 दिवस या प्रक्रियेसाठी लागतात.