आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

घरकुल योजनेचा प्रारंभ : 2022 पर्यंत सर्वांना हक्काचे घर : पंतप्रधान नरेंद्र मोदी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आग्रा - सन २०२२ मध्ये भारतीय स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण होतील तेव्हा देशातील प्रत्येक गरिबाचे स्वत:चे हक्काचे घर असेल, अशी हमी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी येथे दिली. पंतप्रधान ग्रामीण घरकुल योजनेचा प्रारंभ मोदी यांच्या हस्ते झाला. त्यानंतर ते बोलत होते.
या भाषणात मोदींनी केंद्र सरकारने आखलेल्या व राबवलेल्या सर्व प्रमुख योजनांचा आढावा घेतला. शिवाय, ममता बॅनर्जी आणि मायावतींसारख्या नेत्यांना चिमटेही काढले. चिटफंड घोटाळा आणि आमदारांना पैसे घेऊन तिकिटे देण्याच्या प्रकारांना आता नोटबंदीमुळे आळा बसेल, असा दावा त्यांनी केला.

कौशल्य विकास योजनेअंतर्गत लोकांना प्रशिक्षण दिले जात असल्याचे सांगून गरिबांना घर तर मिळेलच, शिवाय कौशल्य अंगी आल्याने हे लोक कामे करून पैसेही कमावतील, असे मोदी म्हणाले.

वेगवेगळ्या राज्यांतील घराबाबत लोकांची असलेल्या मनातील संकल्पना लक्षात घेऊन या योजनेत १०० हून अधिक मॉडेल तयार करण्यात आल्याचे मोदी यांनी सांगितले. गरिबांसाठीच्या या घरात वीज तर मिळेलच, शिवाय पंतप्रधान उज्ज्वला योजनेअंतर्गत स्वयंपाकाचा गॅसही दिला जाईल, अशी हमी त्यांनी दिली. मथुरा-पलवल चौथ्या रेल्वे लाईनचा शुभारंभ मोदी यांच्या हस्ते करण्यात आला. यामुळे रेल्वे वाहतुकीची कोंडी सुटेल, असे ते म्हणाले.

साडेपाच लाख कोटी जमा
नोटबंदीनंतर जनतेने दाखवलेल्या संयमाबद्दल मोदी यांनी आभार मानले. काळ्या पैशाला यामुळे अंकुश लागलाच, शिवाय बँकांत नोटा बदलाच्या निमित्ताने साडेपाच लाख कोटी जमा झाल्याचे ते म्हणाले. यामुळे बँका आता गरजूंना सहजपणे कर्ज देऊ शकतील, असे त्यांनी नमूद केले.
बातम्या आणखी आहेत...