आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

उद्यापासून १४% सेवाकर, प्रत्येक गोष्टच महागणार, रेल्वे एसी भाड्यात ०.५० टक्के वाढ

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - सेवाकराचे वाढीव दर १ जूनपासून लागू होत आहेत. त्यानुसार सोमवारपासून १४ टक्के सेवाकर द्यावा लागणार आहे. सध्या तो १२.३६ टक्के आहे. या वाढीमुळे हॉटेलातील जेवण, चित्रपटाचे तिकीट, रेल्वे, विमान प्रवासासह सर्वच सेवा महागड्या होणार आहेत. अर्थमंत्रालयाने १९ मे रोजी याबाबतची अधिसूचना जारी केली होती. अर्थमंत्री अरुण जेटली यांनी चालू आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पात ही घोषणा केली होती.
दैनंदिन जीवनातील या आवश्यक सेवाही सोमवारपासून महागड्या होणार
जेवण
हॉटेलमध्ये जेवणावर ९.८% सेवाकर लागेल.म्हणजे आधी जर व्हॅट आणि हॉटेलच्या सेवा अधिभारासह तुमचे एकूण बिल १००० रुपये झाले तर १०४९ रुपये मोजावे लागत होते. आता १००० रुपयांच्या बिलावर १०९८ रुपये मोजावे लागतील.
रेल्वेचे एसी भाडे
रेल्वेची एसी, प्रथम श्रेणीची तिकिटे महागतील. सध्या त्यावर ३.७० टक्के सेवाकर आहे. तो वाढून ४.२ टक्के होईल. म्हणजे १००० रुपयांच्या तिकिटावर १० रुपये वाढ होईल. अॅपवर आधारित कॅबसेवाही महागेल.
विमा हप्ता
विम्याच्या हप्त्यासाठी ०.५० % जास्तीची रक्कम मोजावी लागेल. एलआयसीच्या पहिल्या वर्षीच्या हप्त्यावर ३% व दुसऱ्या वर्षीच्या हप्त्यावर १.५% सेवाकर होता. आता पहिल्या वर्षीच्या हप्त्यावर ३.५% आणि दुसऱ्या वर्षी १.७५% कर द्यावा लागेल.
करमणूक
तिकिटांचे भाव वाढणार असल्यामुळे चित्रपट पाहणे महाग होईल. याखेरीज महागड्या ब्यूटी पार्लर-सलूनमध्ये मसाज, फेशियल, स्पा सर्वकाही महाग होईल.
मोबाइलवर बोलणे, इंटरनेट
फोन-मोबाइलच्या बिलांवर आधी १२.३६ % सेवाकर होता. १००० रुपये बिल असेल तर ११२४ रुपये द्यावे लागत होते. आता १४% करामुळे ११४० रुपये द्यावे लागतील.
कमाईत २५% वाढ
{सेवाकर वाढीतून या वर्षी केंद्र सरकारच्या तिजोरीत २.०९ लाख कोटी रुपये जमा होतील. आधी १.६८ लाख कोटी कमाईचा अंदाज होता.
या सेवाही महागणार
{ कुरिअर, अॅपआधारित कॅबसेवा
{ ऑनलाइन तिकीट बुकिंग
{ मंगल कार्यालये, केबल सेवा
परंतु कृषी, मेडिकलसह १६ सेवांच्या किमतींमध्ये कोणताही बदल होणार नाही.
बातम्या आणखी आहेत...