आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मोदी सरकारचे जातीयवादाला प्रोत्साहन, आरोप फेटाळत मनमोहन सिंग यांचा सरकारवर हल्ला

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - माजी पंतप्रधान मनमाेहन सिंग यांनी बुधवारी मोदी सरकारवर तीव्र हल्ला चढवला. सरकार जातीयवादाला प्रोत्साहन देत असून लोकशाही व्यवस्था धोक्यात आली असल्याचा आरोप त्यांनी एका कार्यक्रमात केला.

सिंग म्हणाले, मोदी सरकार लोकशाहीची कल्याणकारी वास्तू उद्ध्वस्त करत आहे. त्यांनी भाजपच्या आर्थिक विकासाच्या दाव्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ग्रामीण भारतात गंभीर आर्थिक संकट असून आर्थिक वसुलीची स्थिती नाजूक झाली आहे. वेगाने आर्थिक विकास साध्य करण्याच्या आडून कल्याणकारी देशाचा आराखडा नष्ट केला जात आहे. सरकारकडून भेदभावपूर्ण व्यवहार आणि जातीयवादाला प्रोत्साहन दिले जात असून सरकारविरुद्धचा असंतोष दाबला जात आहे, असे सिंग यांनी एनएसयूआयने आयोजित कार्यक्रमात सांगितले.

देशात खुला उदारतवादी दृष्टिकोन तसेच धर्मनिरपेक्ष लोकशाहीसाठी काँग्रेसने पक्षाने अपार कष्ट घेतले. या व्यवस्थेवरच आता हल्ला होत आहे. त्यांनी सरकारच्या आर्थिक कामगिरीवर हल्ला चढवला. आर्थिक वसुली होत नसल्याचे सरकारमधील लोकांचे म्हणणे आहे. भाजप सरकारने गेल्या वर्षभरातील आकडेवारीची फेरजुळवणी करून वर्ष अर्थव्यवस्थेसाठी चांगले असल्याचे दाखवले. मात्र, गेल्या वर्षभरातील आर्थिक वसुली कमकुवत राहिली आहे. अर्थ मंत्रालयाचे मुख्य आर्थिक सल्लागार आणि आरबीआयच्या गव्हर्नरचे हेच मत आहे. तुम्ही वास्तव जाणून घेतल्यास वस्तुस्थिती लक्षात येईल, असे सिंग यांनी सांगितले.
मनमोहन सिंग खोटे बोलतात...
माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या वक्तव्यावर भाजपने प्रतिहल्ला चढवला आहे. सिंग एक कठपुतळी असून ते खोटे बोलत असल्याचे म्हटले आहे. भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी गुजरातमध्ये दिलेल्या वक्तव्यात दहा वर्षांच्या कार्यकाळातील १२ लाख कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराची जबाबदारी सिंग टाळू शकत नसल्याचे म्हटले आहे. पंतप्रधानांची जबाबदारी स्वत: भ्रष्टाचार न करण्यापुरती मर्यादित राहू शकत नाही. त्यांनी दुसऱ्यांनाही भ्रष्टाचार करू देऊ नये. पंतप्रधानांकडून भ्रष्टाचारमुक्त सरकारची अपेक्षा असते, असे शहा म्हणाले.
बातम्या आणखी आहेत...