आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Ex Law Minister Kapil Sibbal To Pay Hefty Rent Of 16lakh Per Month For Luxurious House

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नव्या बंगल्यासाठी सिब्बल महिन्याला भाड्यापोटी मोजणार 16 लाख रुपये

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्‍ली - युपीए सरकारमधअये कायदा आणि दूरसंचार अशी महत्त्वाची खाती सांभाळलेले माजी मंत्री कपिल सिब्बल लवकरच लुटियन झोन परिसरातील त्यांच्या अत्यंत पॉश अशा बंगल्यामध्ये स्थलांतरीत होणार आहेत.
या घराच्या भाड्यापोटी सिब्बल यांना महिन्याला 16 लाख रुपये मोजावे लागणार आहेत. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत कपिल सिब्बल यांचा पराभव झाला होता.

द इकॉनॉमिक टाइम्स या इंग्रजी वृत्तपत्रातील एका बातमीनुसार जोरबाग परिसरामध्ये 1250 स्क्वेयर यार्ड परिसरात हा बंगला तयार करण्यात आला आहे. दिल्‍लीचे व्यावसायिक सिद्धार्थ सरीन यांचा हा बंगला आहे. सिब्बल आणि सरीन दोघांच्या वतीनेही बंगला भाड्याने देण्याबाबत करार झाल्याचे मान्य करण्यात आले आहे. मात्र, त्यांनी या व्यवहारातील आर्थिक बाबी उघड करण्यास नकार दिला आहे. सरीन यांनी भाड्यापोटी महिन्याला 18 लाख रुपयांची मागणी केली होती. पण अखेरीस 16 लाख रुपयांवर दोघांची मंजुरी झाल्याचे या कारारशी संबंधित असणा-यांनी सांगितले आहे.
या भाड्यामुळे हे दिल्लीतील महागड्या घरांच्या यादीत आघाडीवर ठरले आहे. नोव्हेंबर 2013 मध्ये मुंबईत कमल मोराका यांनी एक बंगला 18 लाख रुपए महीना भाडे मोजून भाड्याने घेतला होता. चंद्रशेखर यांच्या सरकारमध्ये मंत्री राहिलेल्या मोराका यांनी त्याच मार्गावर असलेला एक बंगला भाड्याने घेतला आहे. सिब्बल यांनी दिलेल्या माहितीनुसार ते तीन मूर्ती रोड येथील सरकारील बंगला लवकरच रिकामा करणार आहेत. 1 ऑगस्टपूर्वी ते नव्या घरात शिफ्ट होणार आहेत.

काय आहे नवीन घरात?
सिब्‍बल यांच्या नव्या घरात एक कार्यालयही असणार आहे. त्याठिकाणी ते पुन्हा वकिली सुरू करणार आहेत. सिब्बल हे देशातील आघाडीच्या वकिलांपैकी एक आहेत. सुमारे दहा वर्षांपूर्वी मनमोहन सरकारमध्ये मंत्री बनल्यानंतर त्यांनी वकिलीमधून विश्रांती घेतली होती.
फाईल फोटो: कपिल सिब्‍बल