आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खासदारांनो, घरे खाली करा; माजी 265 सदस्यांना 18 जूनपर्यंत डेडलाइन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - माजी खासदारांनी त्यांची शासकीय निवासस्थाने तत्काळ सोडावीत, अशी सूचना लोकसभेतील सचिवालयाकडून 265 सदस्यांना देण्यात आली आहे. त्यासाठी खासदारांना 18 जूनची डेडलाइन देण्यात आली आहे.

मावळत्या खासदारांना घर सोडण्याची सूचना देण्याची ही प्रक्रिया नेहमीची आहे, असे सचिव पी. र्शीधरन यांनी सांगितले. मंत्र्यांना मात्र वेगळी डेडलाइन आहे. मंत्र्यांना निवासस्थान म्हणून बंगलो देण्यात आलेले आहेत. त्यांना 26 जूनपर्यंत बंगलो सोडावे लागणार आहेत. त्यांनाही नोटीस पाठवण्यात आली आहे. मालमत्ताविषयक संचालक (डीओई) यांच्याकडून सरकारी बंगल्यांची देखरेख आणि इतर सुविधांना नियंत्रित करण्याचे काम केले जाते, परंतु नवीन खासदारांना घरांचे वाटप करण्याची प्रक्रिया मात्र लोकसभेच्या गृहविषयक समितीकडून पूर्ण केली जाते. दुसरीकडे शहरी विकासमंत्री एम. व्यंकय्या नायडू यांनी माजी मंत्र्यांना तत्काळ बंगले सोडून इतरत्र जावे व चांगले उदाहरण प्रस्थापित करावे, असे आवाहन केले आहे.

नवीन 320 खासदारांची सोय
16 व्या लोकसभेतील 320 नवनिर्वाचित खासदारांना राजधानीतील सरकारी निवासस्थानी सामावून घेण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यात नवनियुक्त मंत्र्यांचाही समावेश आहे.

सभापतींकडून निवड
खासदारांना घरे वाटप करणार्‍या लोकसभा समितीची स्थापना 11 जून रोजी होणार आहे. त्यानंतरच 265 खासदारांच्या घराचा प्रश्न सुटणार आहे. तोपर्यंत माजी खासदारांना घरे सोडण्यासाठी सांगण्यात आले आहे.

सध्याची स्थिती काय?
राज्य व केंद्रशासित प्रदेशाच्या विर्शामगृहातील सुमारे 200 खोल्या व भारतीय पर्यटन विकास महामंडळाच्या दिल्लीतील हॉटेलमधील 150 खोल्यांमध्ये अजूनही माजी खासदारांचा डेरा आहे. त्यात यूपीएचे 70 माजी मंत्री आहेत.