आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ex MPs May Get 75 Percent Hike In Pension, News In Marathi

माजी खासदारांच्या निवृत्तीवेतनात 75 टक्क्यांनी होऊ शकते वाढ; आता मिळतील 35 हजार!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- माजी खासदारांच्या निवृत्तीवेतनात (पेन्शन) 75 टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वातील एनडीए सरकार याबाबत विचार करत आहे. सरकारच्या निर्णयाला मंत्रिमंडळात मंजुरी मिळाली तर देशातील माजी खासदारांना आता महिन्याकाठी 35 हजार रुपये निवृत्ती वेतन मिळेल. यापूर्वी खासदारांच्या निवृत्ती वेतनात 2009 मध्ये वाढ करण्‍यात आली होत‍ी.

एका इंग्रजी वृत्ताने दिलेल्या माहितीनुसार, माजी खासदारांना महिन्याकाठी 20 हजार रूपये निवृत्तीवेतन मिळते. आता त्यात तब्बल 15 हजार रुपयांनी वाढ करण्याच्या मोदी सरकारने हलचाली सुरु केल्या आहेत.

देशाचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्त्वात 2009 मध्ये एनडीए सरकारच्या कार्यकाळात सर्व माजी खासदारांना निवृत्तीवेतनात वाढ करण्यात आली होती. पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणार्‍या खासदारांनाच निवृत्तीवेतन मिळत होते.

दुसरीकडे, मोदी सरकारने पाच वर्षांपेक्षा जास्त कार्यकाळ पूर्ण करणार्‍या खासदारांना मिळणार्‍या अतिरिक्त निवृत्तवेतनातही वाढ केली आहे. केंद्र सरकार अतिरिक्त पेंशनमध्येही दोन हजार रुपयांनी वाढ करण्‍याच्या विचारात आहे. सध्या अतिरिक्त पेंशन 15 हजार रुपये दिले जाते. सध्या खासदारांना प्रतिमहिना 50 हजार रुपये वेतन मिळते.

पुढील स्लाइड्‍सवर वाचा, दिवंगत इंदिरा गांधी यांच्या कार्यकाळात सुरु झाली होती पेन्शन योजना...