आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिना बोरा हत्याकांड; माजी पोलिस आयुक्त राकेश मारियांची चौकशी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- बहुचर्चित शिना बोरा हत्याकांडप्रकरणी सीबीआयने गुरुवारी मुंबईचे माजी पोलिस आयुक्त राकेश मारिया यांच्यासह सहआयुक्त देवेन भारती आणि पोलिस उपायुक्त सत्यनारायण चौधरी यांची चौकशी केली.

शिना बोरा हत्याकांड उघडकीस आल्यानंतर मारिया यांनी हे प्रकरण हाताळले होते. या प्रकरणात पीटर मुखर्जी याचे नाव आल्यानंतर मारिया यांनी त्यांची चौकशी केली नाही. तसेच या प्रकरणात त्यांनी अधिक रस दाखवत मुख्य आरोपी शिनाची आई इंद्राणी मुखर्जीची तुरुंगात जाऊन चौकशी केली होती. या प्रकरणात मारिया यांच्यावर आरोप सुरू झाल्यानंतर त्यांना पोलिस आयुक्तपदावरून हटवण्यात आले होते. मारिया सध्या राज्य होमगार्ड महासंचालक पदावर कार्यरत आहेत.
बातम्या आणखी आहेत...