आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

२६ /११ सारख्या हल्ल्याचा होता महमूद अख्तरचा कट; सैन्याची गोळा केली जात होती माहिती

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआय पुन्हा एकदा २००८ च्या मुंबई हल्ल्याची पुनरावृत्ती करण्याच्या प्रयत्नात होती. पाकिस्तानी उच्चायुक्त कार्यालयातील हेर महमूद अख्तर त्या कटात सहभागी होता, अशी धक्कादायक माहिती उजेडात आली आहे.

अख्तर पश्चिमेकडील किनारपट्टीवर तैनात असलेल्या सैन्याबद्दलची गोपनीय माहिती गोळा करण्याचे काम करत होता. जेणेकरून दहशतवाद्यांना भारतात घुसखोरी करण्यासाठी मार्ग सापडू शकेल. २६/११ च्या मुंबई हल्ल्याच्या घटनेतही दहशतवाद्यांनी सागरी मार्गाचा वापर करून देशात घुसखोरी केली होती. पश्चिमेकडील तट रक्षण, सर क्रिक, कच्छ परिसरातील तैनात सुरक्षा दलाचा तपशील मिळवण्याचा अख्तरने प्रयत्न केला. अख्तरचे माहिती मिळवण्याचे काम सुरू होते. गुजरात, महाराष्ट्र गोव्याच्या सैन्य तळांना लक्ष्य करण्याचा कटही तो करत होता.

पाकने सुरजित सिंह यांना देश सोडण्यास सांगितले
इस्लामाबादमधील भारतीय उच्चायुक्त कार्यालयातील कर्मचारी सुरजित सिंह यांना पाकिस्तानने देश सोडण्याचे आदेश दिले आहेत. त्यामागे मात्र कोणतेही कारण देण्यात आलेले नाही. भारताने या वागणुकीबद्दल शेजाऱ्यांवर टीका केली आहे. सुरजित यांचे काम कूटनीतीच्या निकषाला धरून नव्हते. केवळ एवढी सबब देऊन सुरजित यांना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. पाकिस्तानने ही कारवाई केवळ सूडबुद्धीतून केली आहे. हे वेगळे सांगायची गरज पडत नाही. गेल्या काही दिवसांपासून सीमेवर तणाव वाढवणाऱ्या घटना सातत्याने सीमेपलीकडून सुरू आहेत.

उच्चायुक्त कार्यालयातील अधिकाऱ्यांनाही रिपोर्टिंग
अख्तरची पोलिसांनी कसून चौकशी केली. त्यात अख्तरने काही गोष्टींची कबुली दिली आहे. तो हेरगिरीचे काम करत होता. अख्तरच्या कबुलीचा व्हिडिआे पोलिसांनी बनवला आहे. त्याने उच्चायुक्त कार्यालयातील काही अधिकाऱ्यांचीही नावे घेतली. हेरगिरी मधून मिळालेल्या माहितीला अधिकाऱ्यांपर्यंत पोहचवले जात होते. त्याचे सबळ पुरावे सध्या तरी पोलिसांकडे नाहीत. त्यामुळे उच्चायुक्त कार्यालयातील संबंधित अधिकाऱ्यांवर सध्या काहीही कारवाई करणे शक्य होणार आहे, असे सूत्रांनी सांगितले.

सर क्रिक कच्छमध्ये सेनेच्या माहितीसाठी ५० हजारांचा सौदा
मौलाना रमजान सुभाष जांगीड पाकिस्तान उच्चायुक्त कार्यालयातील हेर अख्तरला सरक्रिक, कच्छमधील सैन्य तैनातीसंबंधीची माहिती देण्यासाठी पोहोचले होते. त्यासाठी त्यांना अख्तरकडून प्रत्येकी ५० हजार रुपये दिले जाणार होते. त्याच दरम्यान दिल्ली पोलिसांनी त्यांना अटक केली.
बातम्या आणखी आहेत...