आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

1991 मध्‍ये ग्रीससारखी होती भारताची अवस्था, गहाण ठेवले होते 47 टन सोने

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्‍ली - भारतीय राजकारणात ' युवा तुर्क' या नावाने परिचित असलेले माजी पंतप्रधान चंद्रशेखर यांची आज (बुधवार) पुण्‍यतिथी. 8 जुलै 2007 ला दिल्‍लीत चंद्रशेखर निधन झाले होते. 1991 मध्‍ये भारताची आर्थिक स्‍थिती आजच्‍या ग्रीससारखी होती. अशा बिकट परिस्‍थितीत त्‍यांनी केयरटेकर पंतप्रधान म्‍हणून भूमिका पार पाडली होती. चंद्रशेखर यांच्या नेतृत्त्वात भारत सरकाला 47 टन सोने विदेशात गहाण ठेवून कर्ज चुकवले होते. चंद्रशेखर यांच्‍याशी संबंधित काही खास बाबींवर 'दिव्य मराठी डॉट कॉम'ने प्रकाश टाकला आहे.

राजकारणासह सामाजिक समस्‍यांची जाण व राजकीय लिखाणासाठीही चंद्रशेखर प्रसिद्ध होते. नोव्‍हेंबर 1990 ते जून 1991 पर्यंत सात महिन्‍यांसाठी त्यांनी देशाचे पंतप्रधानपद भूषवले होते। आणीबाणीच्‍या परिस्‍थितीत ते कॉंग्रेसमध्‍ये असतानाही त्‍यांना अटक झाली होती. चंद्रशेखर पंतप्रधान बनले तेव्‍हा देशाची आर्थिक परिस्‍थिती अत्‍यंत बिकट होती. आधीचे पंतप्रधान राजीव गांधी यांची हत्‍या झाली होती, त्‍यामुळे राजकीय परिस्‍थितीही अस्‍थिर होती.
देशाची अर्थव्‍यवस्‍था संकटात असताना रिझर्व्ह बँकेने सोने गहाण ठेऊन कर्ज घेण्‍याचा निर्णय घेतला होता. देशातील परकीय चलन साठा 1.1 अब्ज डॉलर इतका होता, यावरून तत्‍कालिन गंभीर परिस्‍थितीचा अंदाज येऊ शकतो.

पुढील स्‍लाईडमध्‍ये पाहा कसे ठेवले सोने गहाण..