आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

2जी: मनमोहन म्हणाले होते, सहकार्य न केल्यास परिणाम भोगावे लागतील!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- यूपीए सरकारच्या कार्यकाळातील बहुचर्चित 2जी स्पेक्टम घोटाळ्याप्रकरणी नवा तितकाच धक्कादायक खुलासा करण्‍यात आला आहे. टेलीकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडियाचे (ट्राय) माजी संचालक प्रदीप बैजल यांनी आपल्या पुस्तकातून हा धक्कादायक केला आहे. 2जी प्रकरणात आपल्याला सहकार्य न केल्यास त्याचे परिणाम भोगावे लागतील, अशी धमकी तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी दिल्याचा गंभीर आरोपही बैजल यांनी केला आहे.

2जी घोटाळ्यासाठी 'मनमोहन'च जबाबदार
प्रदीप बैजल यांनी 'द कंप्लीट स्टोरी ऑफ इंडियन रिफॉर्म्स, 2 जी पॉवर अँड इंटरप्रायझेस' हे पुस्तक लिहिले आहे की, देशात खळबळ उडवून देणार्‍या 2जी घोटाळ्याला माजी पंतप्रधान मनमोहन सिंह हेच जबाबदार आहेत. माझ्यासारख्या अधिकार्‍यांना तर काय करावे हेच कळत नव्हते. काही केले तर गुन्हा, नाही केले तरी गुन्हा, अशीच आमची सगळ्यांची अवस्था झाली होती, असेही बैजल यांनी म्हटले आहे.

2जी घोटाळ्याप्रकरणी मी कारवाई करण्याचा निर्णय घेतला तेव्हा तत्कालीन युपीए सरकारने मला अनेक खोट्या आरोपात अडकवण्याची धमकी दिली. 2जी घोटाळ्याला माजी दूरसंचार मंत्री दयानिधी मारन यांच्याइतकेच माजी पंतप्रधान मनमोहन सिंह हे देखील तितकेच जबाबदार आहेत.
मारन म्हणाले होते, सर्व निर्णय मीच घेईल
दूरसंचारमधील मीच 'पंतप्रधान' आहे. त्यामुळे सर्व निर्णय मीच घेईल, असे तत्कालीन दूरसंचार मंत्री दयानिधी मारन यांनी म्हटले होते असा आरोप बैजल यांनी केला आहे. 2जी प्रकरणात सहकार्य न केल्यास त्याचे वाईट परिणाम भोगावे लागतील, अशी आपल्याला मारन यांनी धमकीही दिली होती. त्याचप्रमाणे मला आणि मंत्रिमंडळाला सहकार्य करा, अशा सूचना मनमोहन सिंह यांनी दिल्या होत्या. बैजल यांनी 2जी प्रकरणात फसवण्यासाठी 'सीबीआय'लाही आरोपीच्या पिंजर्‍यात उभे केले आहे.

पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा, कोण आहेत प्रदीप बैजल