आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Exclusive interview of kiran bedi she says will protect women in delhi

किरण बेदी करणार मोदींची नक्कल, दिल्लीकरांसाठी रेडियोवर करणार \'दिल की बात\'!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- दिल्ली विधानसभा निवडणुकीदरम्यान भाजपात प्रवेश करून मुख्यमंत्रीपदाची उमेदवार असलेल्या किरण बेदी यांनी विरोधी पक्षांची चांगलीच चिंता वाढली आहे. किरण बेदींना भाजपने कृष्णानगर जागेवरून उमेदवारी दिली आहे. तसेच त्यासाठी बेदी प्रचारात खूप मेहनत घेत आहेत. केवळ आपल्या मतदारसंघातच नव्हे तर इतर मतदारसंघातील पक्षाच्या उमेदवारांचा जोरदार प्रचार करीत आहेत. दैनिक भास्कर.कॉमचे प्रतिनिधी पियुष पांडे यांनी किरण बेदीशी साधलेला संवाद..
प्रश्न- किरणजी, तुम्ही प्रभावी प्रशासन व तत्काळ न्याय याचा उल्लेख करता पण चार दिवसापूर्वी पक्षात आलेल्या व्यक्तीला मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार जाहीर करणे आणि सायंकाळी सदस्य बनवून एखाद्या नेत्याला तिकीट देणे म्हणजे जुन्या कार्यकर्त्यांवर अन्याय केल्यासारखे नाही?
किरण बेदी- हा माझा निर्णय नव्हता, जो पक्षाने निर्णय घेतला तो मी आनंदाने स्वीकारला. पक्षाने मला लोकांसाठी काम करण्याची संधी दिली आहे. जी मी पूर्ण जबाबदारीने आणि क्षमतेने पार पाडणार आहे. मोदी पंतप्रधान बनल्यानंतर लोकांचा राजकारणाकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलला आहे. पहिल्यासारखे लोक आता नकारात्मक विचार करीत नाहीत.
प्रश्न- पंतप्रधान मोदींबाबत आपला सॉफ्ट कॉर्नर काही महिन्यांपासून दिसून आला होता. मात्र, भाजपमध्ये सामील होण्याचा निर्णय तुम्ही नेमका कधी आणि कसा घेतला.
किरण बेदी- मोदींनी आपल्या कुशल नेतृत्त्वाने सा-या देशाला आपल्याकडे खेचले. आज लोक विकासावर बोलतात. भाजपात जाण्याबाबत बोलायचे झाल्यास अनेक नेत्यांनी राजकारणात येण्यासाठी प्रेरित केले. सर्व काही एका दिवसात नक्कीच घडले नाही. भाजपचे अनेक नेते मला भेटले. काही कालावधीनंतर मला खरेच राजकारणात जाऊन लोकांची समस्या सोडविण्याचा विचार सुरु केला. मला एक पोलिस अधिकारी, समाजसेवक म्हणून अनेक वर्षांचा अनुभव आहे. त्यामुळे लोकांच्या नेमक्या काय समस्या असतात याची मला जाण आहे. त्यामुळेच भाजपकडून विचारणा झाल्यानंतर तत्काळ मी पक्षात प्रवेश केला व पक्षाने मला मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार जाहीर केले.
प्रश्न- भाजपात तुमच्यामुळे असंतोष पसरला आहे. त्याचा निवडणुकीत परिणाम भोगावा लागतो. त्यासाठी तुमचे नियोजन काय आहे?
किरण बेदी- पक्षात काहीही नाराजी नाही, सर्व माझ्यासोबत आहेत. कार्यकर्त्यांना भेटले तेव्हा माझ्यासोबत तमाम पदाधिकारी उपस्थित होते. एवढेच नव्हे तर अनेक खासदार आणि पक्षाचे अध्यक्षही उपस्थित होते.
प्रश्न- जेव्हा तुम्हाला दिल्लीचे पोलिस आयुक्त बनविण्यात आले नाही त्याची खंत आहे. मात्र आता तर दिल्लीचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार तुम्ही आहात काय सांगाल?
किरण बेदी- मी नेहमीच सरळ मार्गाने जीवन जगण्याचे व एखाद्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा प्रयत्न करते. दिल्ली पोलिस आयुक्तपद न मिळाल्याची अजिबात खंत नाही. तसे असते तर तुम्हाला याआधीच याबाबत माहिती मिळाली असती. राजकारणाबाबत बोलायचे झाल्यास मी राजकारण येण्यास उत्सुक नव्हती. कारण त्यावेळी राजकारणाबाबत झालेली नकारात्मकता. मात्र, मोदी पंतप्रधान झाल्यापासून सकारात्मक वातावरण तयार झाले आहे. देशभर आता केवळ विकासावर चर्चा होऊ लागली जी पू्र्वी घोटाळ्यावर होत असे.
प्रश्न- दिल्लीत तुमचे सरकार आल्यास कोणत्या मुद्यांना प्राथमिकता द्याल, सर्वात प्रथम तुम्ही कशाला प्राधान्य द्याल?
किरण बेदी- अनेक विषयांना प्राधान्य द्यावे लागेल कारण सर्वच मुद्दे महत्त्वाचे आहेत. सर्वप्रथम महिला सुरक्षा, धोरण तयार करणे, प्रत्येक महिन्याला आढावा घेणे. चुकांचे विश्लेषण केले जाईल. जेव्हा गुन्हे घडतात ते कशामुळे घडले याचा अभ्यास त्यानुसार रणनिती आखली जाईल. याबाबत दर महिन्याला रेडियोवरून याबाबतची माहिती दिली जाईल. मोदींच्या मन की बातप्रमाणेच दिल की बात ही होईल. मी पाहिले आहे की जेव्हा पंतप्रधान मोदी रेडियोवर बोलतात तेव्हा छोटी मुले खूप प्रभावित होतात. त्यासाठीच मी दिल्लीतील लोकांसाठी, मुलांसाठी दिल की बात करेन.