आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Exclusive: Tushar Gandhi Unhappy For Modi Replace Mahatma Gandhi In Ckvics Calendar

‘खादी’च्या कॅलेंडरवर नरेंद्र मोदी; पेटला वाद, पूर्वीही अनेकदा गांधीजींचे चित्र नव्हते: पीएमओ

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - खादी ग्रामोद्योग मंडळाची डायरी, तसेच कॅलेंडरवर महात्मा गांधींऐवजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे छायाचित्र झळकल्यामुळे नवा वाद पेटला आहे. यावरून काँग्रेस व इतर काही पक्षांनी पंतप्रधानांवर जोरदार टीका केली. तर, पंतप्रधान कार्यालयाने वाद निरर्थक असल्याचे म्हटले आहे.

यापूर्वीही असे घडल्याचा दाखला देत यापूर्वी सन  १९९६, २००२, २००५, २०११, २०१२, २०१३, २०१६मध्येही यावर गांधीजींचे छायाचित्र नव्हते, असे पंतप्रधान कार्यालयातील सूत्रांनी म्हटले आहे.

महात्मा गांधी यांचे छायाचित्र कॅलेंडरवरून काढून टाकल्याबद्दल खादी ग्रामोद्योगच्या काही कर्मचाऱ्यांनी निदर्शने केली होती. या कर्मचाऱ्यांनी आपला मोदींच्या छायाचित्राला आक्षेप नसल्याचे सांगून गांधीजींचे छायाचित्र काढून टाकण्याला आक्षेप असल्याचे म्हटले होते.
मंगलयान इफेक्ट : राहुल गांधी यांनी या मुद्द्यावर ट्विट करून मंगळयान मंगळावर उतरल्याचे ज्या पद्धतीने श्रेय लाटले तसेच खादी-ग्रामोद्योगाला चालना दिल्याचे श्रेय मोदी लाटू पाहत असल्याचे म्हटले आहे.

हे ऐतिहासिक प्रतीक : खादी आणि गांधीजी हे आपल्या देशाच्या इतिहासाचे ऐतिहासिक प्रतीक आहे. हे प्रतीक काढून स्वत:चे छायाचित्र छापणे पाप असल्याचे कॉंग्रेसचे मुख्य प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी म्हटले आहे.

आता मोदींना काय म्हणायचे? : चरखा आणि महात्मा गांधी हे मनात िबंबलेले प्रतीक आता मोदींच्या रुपात दिसत आहे. गांधीजी राष्ट्रपिता होते. मोदीजींना काय म्हणायचे?, अशा शब्दांत प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी टीका केली.
 
पंतप्रधानांनी खादीला प्रतिष्ठा मिळवून दिली...
काँग्रेसच्या ५० वर्षांच्या कारकीर्दीत खादीचा खप देशात केवळ २ ते ७ टक्क्यांवरच अडकला होता. गेल्या दोन वर्षांत तो ३४ टक्क्यांहून अधिक झाला आहे. पंतप्रधानांनी खादीला प्रतिष्ठा मिळवून दिल्यानेच ते शक्य झाले असल्याचे पंतप्रधान कार्यालयाच्या सूत्रांनी सांगितले.
 
पुढील स्लाइड्‍सवर वाचा, महात्मा गांधींच्या छायाचित्राऐवजी नरेंद्र मोदींचे छायाचित्र प्र‍काशित झाल्याबद्दल काय म्हणाले त्याचे पणतू तुषार गांधी.... पंतप्रधान हुकूमशाहीकडे वाटचाल असल्याचा शिवसेनेचा घणाघात... हे तर मनोविकाराचे लक्षण असे कोण म्हणाले... 

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)