आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Execution Of Terrorist Afzal Guru Invaild, Tharoor Complain

दहशतवादी अफझल गुरूची फाशी अवैध असल्याचा थरूर यांची तक्रार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांनी नवीन वादाला तोंड फोडले आहे. संसद हल्ल्यातील दोषी अफझल गुरूला दिलेली फाशी बेकायदा असल्याचे त्यांनी म्हटले आहे. या मुद्द्यावरील एका टिप्पणीच्या उत्तरादाखल थरूर यांनी टि्वटरवर म्हटले की, गुरूची फाशी चुकीची होती.
फाशी अशा पद्धतीने द्यावयाला नको होती. कुटुंबाला माहिती देणे आवश्यक होते. गुरूला नऊ फेब्रुवारी २०१३ रोजी फाशी देण्यात आली. काश्मीरमध्ये गुरूच्या फाशीवर मंगळवारी आणि जेकेएलएफचे संस्थापक मोहंमद मकबूल भट यांच्या स्मरणार्थ फुटीरतावाद्यांनी ११ रोजी बंदचे आवाहन केले आहे.