आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTO - फेसबुकचे संस्थापक मार्क झुकरबर्ग यांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - जवळपास १२ लाख कोटी रुपयांची कंपनी असलेल्या फेसबुकचे संस्थापक मार्क झुकरबर्ग यांनी शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. या भेटीमध्ये डिजीटल इंडिया आणि सरकारी कामकाजात अधिक पारदर्शकता आणि पर्यटन यांसारख्या मुद्द्यांवर चर्चा झाली. फेसबुकवर मोदींचे दोन कोटी फॉलोवर्स आहेत. याबाबतीत मोदी ओबामानंतर दुसर्‍या क्रमांकावर आहेत.
भारत दौर्‍यामध्ये शुक्रवारी सकाळी मार्क यांनी कायदा आणि दूरसंचार मंत्री रविशंकर प्रसाद यांचीही भेट घेतली. रविशंकर प्रसाद यांच्या भेटीमध्ये मार्कने भारतामध्ये इंटरनेटच्या कनेक्टीव्हीटीवर जास्त भर दिला. मार्क म्हणाले की, लोकांच्या खुशीसाठी आणि त्यांच्या सुरक्षिततेसाठी इंटरनेट अत्यावश्यक आहे. त्यामुळे इंटरनेट अधिक स्वस्त व्हायला हवे. त्यानंतर संध्याकाळी मार्क यांनी पंतप्रधानांची भेट घेतली.
पुढील स्लाईडमध्ये पाहा, या भेटी दरम्यानचे मार्क झुकरबर्ग आणि नरेंद्र मोदी यांची छायाचित्रे