आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मतदानोत्तर चाचणी: चार राज्यांत भाजपच्या सत्तेचे संकेत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - दिल्लीत बुधवारी मतदान संपताच एक्झिट पोलचे अंदाज समोर आले. त्यानुसार पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीच्या निकालात प्रचंड बहुमत मिळवून भाजप मुसंडी मारणार असल्याचे दाखवण्यात आले. मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये भाजपची सत्ता कायम राहील, तर राजस्थानातही कमळ बहरणार आहे. या राज्यात काँग्रेसचा दारुण पराभव होईल, असे एक्झिट पोलमध्ये म्हटले आहे.
दिल्लीत काहीसा पेच निर्माण झाला आहे. काँग्रेसचा पराभव तर होत आहे, पण भाजपला बहुमत मात्र मिळताना दिसत नाही. आम आदमी पार्टीने कोंडी केली आहे. अनेक वृत्तवाहिन्यांवरून सर्वेक्षण यंत्रणांच्या हवाल्याने एक्झिट पोलचे अंदाज दाखवले गेले. काँग्रेसला मिझोराममध्येच आशा आहे. तेथे पक्षाला बहुमत मिळू शकते. दिल्लीत आम आदमी पार्टीचे सरकार येत नाही, परंतु अरविंद केजरीवाल विद्यमान मुख्यमंत्री शीला दीक्षित यांना धूळ चारतील, असे दिसते. तथापि, या सर्वेक्षणाचे अहवाल आणि निकाल यात तफावत आढळून आली आहे. मतमोजणी रविवार, 8 रोजी आहे.
दिल्लीत विक्रमी 67 % मतदान.
भाजपला सर्वेक्षण मान्य, काँग्रेसने नाकारले
भाजपच्या विकास धोरणाला जनतेचा पाठिंबा मिळाल्याचे एक्झिट पोलमध्ये दिसते. -शाहनवाज हुसेन, भाजप
एक्झिट पोलचे हे निकाल कच-याच्या पेटीत फेकून देण्याच्या लायकीचे आहेत. -दिग्विजयसिंह, काँग्रेस
चार सर्वेक्षण यंत्रणांचे निकाल जवळपास एकसारखेच