आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Exit Poll News In Marathi For Delhi, Mp, Chhattisgarh, Rajasthan, Mizoram.

जाणून घ्या, पाच राज्यात जनतेचा कौल कोणाला? 30,000 कोटींचा सट्टा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - मध्यप्रदेश, दिल्ली, राजस्थान आणि मिझोराम या पाच राज्यातील मतदानानंतर विविध एक्झिट पोलने भारतीय जनता पक्षाल बहुमत मिळण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. एबीपी-नील्सन, इंडिया टुडे-ओआरजी, टाइस्म नाऊ-सी वेटर यांच्या एक्झिट पोलमध्ये सर्व पक्षांच्या जागा कमी जास्त दाखवण्यात आल्या आहेत मात्र, संकेत भाजप सत्तेत येणार असेच आहेत. या सर्व एक्झिट पोलमध्ये चार राज्यांमध्ये भाजप सत्तेवर येताना दिसत आहे तर फक्त मिझोराममध्ये काँग्रेस सत्तेत येणार असल्याचे म्हटले आहे.
पाच राज्यांच्या निवडणूकीवर राजकिय विश्लेषकच नाही तर ज्योतिष आणि सट्टेबाजही भविष्यवाणी करीत आहेत. सुत्रांच्या माहितीनुसार या विधासभा निवडणुकीवर 30,000 रुपयांचा सट्टा लागला आहे. सट्टेबाजांनी कोणत्या राज्यात कोणत्या पक्षाची सत्ता येणार आणि किती जागा मिळणार, हे देखील ठरविले आहे.
टाइम्स नाऊ-सी वोटर चा एक्झिट पोल
* दिल्‍ली: काँग्रेस 21, भाजप 29, आप 16 आणि इतर 4
* राजस्‍थान: टाइम्स नाऊ-सी वोटर : भाजप 130, काँग्रेस 48, इतर 21
* मध्‍य प्रदेश: काँग्रेस 92, भाजप 128, इतर 10
* छत्‍तीसगड: भाजप 44, काँग्रेस 41, इतर 5
मिझोराम : टाइम्स नाऊ- सी वोटरच्या एक्झिट पोलमध्ये काँग्रेसला 19, मिझो नॅशनल फ्रंट आणि मिझो पीपल्स कॉन्फरंस 14 जागा मिळण्याची शक्यता आहे. तर , जोराम नॅशलिस्ट पक्षाला 5 आणि इतरांना 2 जागा मिळण्याची शक्यता आहे. मिझोराममध्ये 40 जागांसाठी लढत झाली.