आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दहशतवाद्याला आश्रय देणारा अटकेत, पाकमधील घराचा VIDEO आला समोर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
व्‍हीडिओ पाहण्‍यासाठी फोटोमध्‍ये क्लिक करा - Divya Marathi
व्‍हीडिओ पाहण्‍यासाठी फोटोमध्‍ये क्लिक करा
फैसलाबाद/नई दिल्ली - जम्मू-कश्मीरच्‍या बॉर्डर सिक्युरिटी फोर्स (बीएसएफ)वर झालेल्‍या हल्‍ल्‍यानंतर पकडल्‍या गेलेला दहशतवादी नावेदला भारतामध्‍ये आश्रम देणाऱ्याला व्‍यक्‍तीला कुलगाव येथून आज (शनिवार) टक करण्‍यात आली. फयाज अहमद असे त्‍याचे नाव आहे. दहशतवादी नावेद हा तब्‍बल दीड महिने भारतात कसा राहिला, याचा तपास नॅशनल इन्वेस्टिगेशन एजेंसी करत आहे.
पाकिस्‍तानातील नावदेच्‍या घरी पोहोचले पत्रकार
नावेदचा पाकिस्‍तानमधील पत्‍ता सापडला असून, त्‍याच्‍या घरापर्यंत मीडिया पोहोचला आहे. पाकिस्तानातील फैसलाबादमधील रफीक कॉलोनीमध्‍ये त्‍याचे घर आहे. दारात मोठ्या संख्‍येने आलेल्‍या पत्रकारांना पाहून नावेदच्‍या कुटुंबियांनी घराबाहेर येणे टाळले. दरम्‍यान, 'नावेदने काय केले?' असा प्रश्‍न शेजा-यांनी पत्रकारांना विचारला.
पाकिस्तानचा खोटारडेपणा झाला उघड
जम्मू-कश्मीरच्‍या उधमपूरमध्‍ये बुधवार पकडेला दहशवादी नावेद हा आपला नागरिक नाही, असे पाकिस्तानने स्‍पष्‍ट केले. पण, नावेदचे वडील मोहम्मद याकूब यांनी एका इंग्रजी वृत्‍तपत्राला दिलेल्‍या मुलाखतीत स्‍वत:ला 'बदकिस्मत बाप' म्‍हटले आणि तो आपला मुलगा असल्‍याचे मान्‍य केले. त्‍यामुळे पाकिस्‍तानचा खोटारडेपणा उघड झाला आहे.

पुढील स्‍लाइड्सवर पाहा, पाकिस्तानमधील नावेदचे घर आणि उधमपूरमधील हल्‍ल्‍याचे फोटोज...