आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खुशखबर: एअरपोर्टवर बोर्डिंग पास सिस्टिम बंद करण्याचा विचार, CISF ने दिला केंद्राला प्रस्ताव

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - एव्हिएशन सिक्युरिटी एजन्सीज विमानप्रवास आरामदायक बनवण्यासाठी बोर्डिंग पास कलेक्शन सिस्टिम बंद करण्याची योजना बनवत आहे. या जागी बायोमॅट्रिकच्या मदतीने एक्स्प्रेस चेक-इन सिस्टिम सुरू केली जाईल. एअरपोर्ट सिक्युरिटी फोर्स CISF ने याचा प्रस्ताव दिला आहे. तथापि, देशात एक डझनाहून जास्त विमानतळांवर हँड बॅगेजवर टॅग लावण्याची सिस्टिम अगोदर बंद करण्यात आलेली आहे.
 
59 विमानतळांवर बोर्डिंग कार्ड लेस सिस्टिमवर विचार सुरू...
 - सीआयएसएफचे डायरेक्टर जनरल ओ.पी. सिंग यांनी पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत याची माहिती दिली. ते म्हणाले की, आम्ही 59 विमानतळांवर बोर्डिंग कार्ड लेस सिस्टिमसाठी आवश्यक तंत्रज्ञानाच्या शक्यतेवर विचार सुरू केला आहे. अशाने इतर सार्वजनिक सुविधाही भविष्यात 'युनिफाइड क्रमांका'अंतर्गत यात समाविष्ट होऊ शकतील.
 
2 प्रोजेक्टवर सीआयएसफचे काम सुरू
 - ओ.पी. सिंग म्हणाले- आम्ही 2 प्रोजेक्टवर काम करत आहोत. पहिला प्रोजेक्ट हा आहे की एअरपोर्ट‌्सवर इंटिग्रेटेड सिक्युरिटी सोल्युशन्स कसे लागू केले जातील. याशिवाय सुरक्षा एजन्सीजच्या दरम्यान सर्व दुवे जोडावे लागतील. हे करण्यासाठी आमच्याकडे अनेक शक्यता आहेत. आमच्याकडे बायोमेट्रिक्स, व्हिडिओ अॅनालिटिक्स आणि एक खूप मजबूत अॅक्सेस कंट्रोल सिस्टिम आहे. या सर्व गोष्टी इंटरकनेक्ट करण्याचा प्रयत्न करू.
बातम्या आणखी आहेत...