नवी दिल्ली - सरकारने जीएसटी परतावा व त्याअंतर्गत कर भरण्यासाठी शनिवारी ५ दिवसांची मुदतवाढ दिली. त्यामुळे व्यावसायिक २५ ऑगस्टपर्यंत परतावा व कर भरू शकतील. जीएसटीएन पोर्टलमध्ये तांत्रिक अडसर येत असल्यामुळे परतावा व कर भरण्यात अडचणी येत आहेत.
याआधी जुलैच्या परताव्याची मुदत २० ऑगस्टपर्यंत होती. युजर्सच्या वाढत्या संख्येमुळे पोर्टल कुचकामी ठरले. या पार्श्वभूमीवर अर्थ मंत्रालयाने जारी केलेल्या पत्रकात जुलैच्या जीएसटी देयकाची मुदत २५ ऑगस्ट करण्यात आल्याचे नमूद केले आहे.