नवी दिल्ली - इराकमध्ये अडकलेल्या जवळ-जवळ 10 हजार भारतीयांच्या सुटकेबाबत ठोस पावले उचलण्यासाठी भारताचे अरब देशातील राजनैतिक अधिका-यांची रविवारी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत चर्चा करण्यात आली. राजनैतिक अधिका-याव्यतिरिक्त अरब देशातील राजदूतही बैठकीला उपस्थित होते.
इराकमध्ये असलेल्या भारतीयांची सुरक्षा आणि त्यांना देशात आणण्याकरिता भविष्यातील रणनीती निश्चित करण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. तसेच आतापर्यंत घेण्यात आलेल्या निर्णयांचा आढावाही घेण्यात आला.