आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Extremists Opposed Flag Hoisting Modern Education In Muslim Girls School

मुस्लिम गर्ल्स स्कूलध्ये ध्वजारोहण व मॉडर्न एज्युकेशनला विरोध

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ग्रेटर नोयडा- मुस्लिम गर्ल्स स्कूलमध्ये आज, मंगळवारी प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाची तयारी सुरु असताना काही लोकांना ध्वजारोहण व मॉडर्न एज्युकेशनला कडाडून विरोध केला. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून परिस्थिती आणखी चिघळण्याच्या आत त्यावर नियंत्रण मिळवले.

मॉडर्न एज्युकेशनला विरोध...
- दानकौर भागातील सैय्यद भूरेशाह गर्ल्स स्कूलमध्ये ही घटना घडली.
- प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाची तयारी सुरु असताना काही समाज कंटक स्कूलमध्ये आले त्यांनी कार्यक्रमाची तयारी करणार्‍या कार्यकर्त्यांना धमकावत त्यांना पळवून लावले.
- स्कूलचे रजिस्ट्रेशन यूपीच्या मायनोरिटी वेलफेयर डिपार्टमेन्टमध्ये झाले आहे.
- विरोध करणार्‍या लोकांना पोलिसांना सांगितले की, स्कूलमध्ये हिंदी व इंग्रजी शिकवली जाऊ नये. त्याचप्रमाणे प्रजासत्ताक दिनी ध्वजारोहण देखील करण्यात येऊ नये.
- पोलिसांनी विरोधकांवर कायदेशीर कारवाईचा इशारा दिला आहे.

काय म्हटले स्कूल प्रशासनाने?
- स्कूलचे सेक्रेटरी आदिर खान जयसवाल यांनी सांगितले की, स्कूलमधून विद्यार्थ्यांना मॉडर्न एज्युकेशन देण्याचा मानस आहे. परंतु काही कट्टरपंथी अडचणी निर्माण करत आहे.
- आदिर म्हणाले, स्कूल शिक्षकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. ते स्कूलमध्ये येण्यास घाबरतात. यासंदर्भात आम्ही यूपी सरकारकडे तक्रार केली आहे.

पुढील स्लाइडवर पाहा सिम्बॉलिक इमेज...