आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारताने LoC वर फौजा वाढवल्या, भेदरलेल्या PAK ने इस्लामाबादेत उतरवले फायटर प्लेन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाकिस्तानी पत्रकाराने गुरुवारी रात्री हा फोटो सोशलम मीडियावर शेअर करत दावा केला की इस्लामाबादच्या आकाशात चार एफ-16 दिसले. - Divya Marathi
पाकिस्तानी पत्रकाराने गुरुवारी रात्री हा फोटो सोशलम मीडियावर शेअर करत दावा केला की इस्लामाबादच्या आकाशात चार एफ-16 दिसले.
नवी दिल्ली/इस्लामाबाद - उरीमध्ये दहशतवादी हल्ल्यानंतर भारत व पाकिस्तानदरम्यान तणाव वाढत चालला असून सीमेवरही अचानक हालचाली वाढल्या अाहेत. पाकने जोरदार लष्करी तयारी सुरू केल्याने भारतानेही युद्धजन्य स्थितीत आवश्यक सज्जता सुरू केली. यात ताबा रेषेवर नव्याने सैनिक तैनात करण्यात येत असून यासोबत शस्त्रास्त्रे आणि इंधनाचे साठेही वाढवण्यात येत आहेत. एकूणच युद्धासारखी स्थिती निर्माण झाली आहे.
काही माध्यमांनी याबाबत दावा करताना म्हटले आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी रात्री पुन्हा एकदा वॉर रूमला भेट देऊन बराच वेळ या ठिकाणी घालवला. ताबा रेषेवर सुरू असलेल्या लष्कराच्या हालचालींचा त्यांनी आढावा घेतला. संरक्षण क्षेत्रातील सूत्रांनुसार, पाकिस्तानी हवाईदलाच्या अचानक हालचाली वाढल्या व लढाऊ विमानांनी लष्करी सराव सुरू केल्याच्या पार्श्वभूमीवर भारतीय लष्कर सतर्क झाले आहे. पाकिस्तानी हवाईदलाची विमाने उत्तरेकडील भागांत लष्करी सराव करत असून पाकव्याप्त काश्मीरमध्ये नो फ्लाय झोन जाहीर करण्यात आलेला आहे. दुसरीकडे, पाकिस्तानी परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते
नफिस झकारिया यांनी पाकिस्तानी लष्कर देशाच्या संरक्षणासाठी पूर्णपणे सज्ज असल्याचे गुरुवारी दुपारी म्हटले होते.
इस्लामाबादवर एफ-१६ विमानांच्या घिरट्या, इस्लामाबाद-पेशावर महामार्ग बंद
उरीमधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने कठोर भूमिका घेतल्याने पाकिस्ताननेही युद्धासारखी तयारी सुरू केली आहे. गुरुवारी इस्लामाबाद-लाहोर आणि इस्लामाबाद-पेशावर महामार्ग बंद करण्यात आले आहेत. या महामार्गांवर पाकिस्तानी हवाईदलाची लढाऊ विमाने उड्डाणे तसेच लँडिंगचा सराव करत आहेत. यादरम्यान, इस्लामाबादच्या आकाशात गुरुवारी रात्री दहाच्या सुमारास सात एफ-16 जातीची तीन-चार विमाने घिरट्या घालत असताना दिसली. या विमानांच्या आवाजाने अनेक लोक घाबरून रस्त्यावर पळत आले. इस्लामाबाद-लाहोर हा महामार्ग पाकिस्तानचा सर्वात व्यस्त महामार्ग आहे. तोच मार्ग दोन दिवसांसाठी बंद करून यावरील वाहतूक जुन्या डोंगरातील रस्त्यावरून वळवण्यात आली आहे. हवाईदलाचे प्रवक्ते जावेद मुहम्मद अली यांनी म्हटले आहे की, या महामार्गाची सद्य:स्थितीत हवाईदलास गरज आहे. त्यामुळे सामान्य लोकांसाठी तो खुला राहणार नाही.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, इस्लामाबादेतील आकाशात दिसले फायटर प्लेन...
बातम्या आणखी आहेत...