आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कारगिल शहिदाच्या मुलीने ABVPला ठणकावले, फेसबुकवर लावला असा प्रोफाइल फोटो

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- रामजस कॉलेज वादानंतर कारगिल शहिदाच्या मुलीने अभाविपच्या विरोधात फेसबुकवर मोहीम सुरू केली. शहीद कॅप्टन मनदीप सिंह यांची मुलगी गुरमेहर कौरने फेसबुकवर प्रोफाइलवर कार्ड हाती धरलेला फोटो पोस्ट केला आहे. त्याखाली तिने ‘मी दिल्ली विद्यापीठाची विद्यार्थिनी आहे आणि मी अभाविपला घाबरत नाही’, असे लिहिले आहे.
 
अभाविपने विद्यार्थ्यांवर केलेला हल्ला हा लोकशाही व स्वातंत्र्यावरील हल्ला आहे. त्याला आवर घातला पाहिजे. आमच्यावर फेकलेला प्रत्येक दगड आम्हाला जखमी करू शकतो. मात्र आमच्या इच्छाशक्तीला नव्हे, असे गुरमेहरने लिहिले आहे. गुरमेहर लेडी श्रीराम कॉलेजची विद्यार्थिनी आहे. गुरमेहरने देशातील विद्यार्थ्यांना आपल्या प्रोफाइलवर असाच फोटो पोस्ट करण्याचे आवाहन केले. आतापर्यंत तिच्या पोस्टला २ हजार १०० प्रतिक्रिया मिळाल्या. पोस्ट ३ हजार ४५६ वेळा शेअर झाली.
बातम्या आणखी आहेत...