नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदींची गुरूवारी जगातील सर्वात मोठ्या नेटवर्किंग सोशल साइट असलेल्या
फेसबुकच्या मुख्य कार्यकारी अधिकारी शेरील सँडबर्गने भेट घेतली. शेरील यांनी पंतप्रधानाशी ई-गव्हर्नन्स आणि शिक्षण क्षेत्रात फेसबुकची कशी मदत होईल याबाबत चर्चा केली. यानंतर त्यांनी माहिती आणि प्रसारण मंत्री रवि शंकर प्रसाद यांचीही भेट घेतली. शिक्षण, आरोग्य आणि नागरिकांशी संबंधित गोष्टींसाठी फेसबुकची खूप मदत होऊ शकते असे प्रसाद यांनी सांगितले. शेरील या पूर्वीही भारताच्या दौ-यावर आल्या होत्या. त्यावेळी त्यांनी सांगितले होते, की मोदी जगात दुस-या क्रमांकाचे लोकप्रिय नेते आहेत. त्यांचे 18 कोटी फेसबुक मित्र आहेत. यासंदर्भात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा पहिल्या क्रमांकावर आहेत. मोदींनी आपल्या आईचे दर्शन घेतानाचा फोटो फेसबुकवर खूप लोकप्रिय झाला, असे शेरील यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. तो माझाही आवडता फोटो आहे.
मोदींसारख्या नेत्याने सोशल मीडियाला महत्त्व प्राप्त करून दिले. फेसबुक आता भारतात आपली गुंतवणुक वाढवणार आहे. देशात फेसबुक वापरकर्त्यांची संख्या 10 कोटीपेक्षाही अधिक आहे, असे शेरील यांनी स्पष्ट केले.
पुढील स्लाइड्सवर पाहा छायाचित्रे......