आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Facebook Friend Request Three Times Sent To Jail

फेसबुक: एखाद्या तरुणीला तिसर्‍यांदा फ्रेंड रिक्‍वेस्‍ट पाठवाल तर जाल तुरुंगात !

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आगरा- सोशल नेटवर्किंग साइट 'फेसबुक'च्या माध्यमातून एखाद्या तरुणीला जर तिसर्‍यांदा फ्रेंड रिक्‍वेस्‍ट पाठवाल तर खबरदार! तुम्हाला तुरुंगाची हवा खावी लागू शकते. फेसबुकच्या माध्यमातून तरुणींना वारंवार फ्रेंड रिक्वेस्ट पाठवून त्रास देणे बेकायदा असल्याचे उत्तर प्रदेश (यूपी) पो‍लिसांनी म्हटले आहे. आता यापूढे फेसबुकवरील हलचालीवर पोलिसांची करडी नजर असणार आहे. याबाबत उत्तर प्रदेशातील सर्व जिल्हा पोलिस ठाण्यांना एक परिपत्रही पाठवण्यात आले आहे. गुन्हा सिद्ध झाल्यास पाच लाख रुपये दंड आणि तीन वर्षांचा तुरूंगवासाचेही प्रावधान ठेवण्यात आले आहे.

मुंबईतील ‘फेसबुक लव्हर’ अखेर जळगाव पोलिसांच्या जाळ्यात

'फेसबुक'वर सुंदर छायाचित्र पाहताच तरुण त्यांना फ्रेंड रिक्‍वेस्‍ट पाठवत असतात. त्यांची फ्रेंड रिक्वेस्ट तरुणींकडून रिजेक्ट केल्यानंतरही ते थांबत नाही. तरुणींना वारंवार फ्रेंड रिक्वेस्ट पाठवतात. परंतु आता तरुणींना वारंवार फ्रेंड रिक्वेस्ट पाठवणे महागात पडू शकते.

फेसबुक स्वच्छतेसाठी वापरा ‘फेसवॉश’

'फेसबुक'वरून एखाद्या तरुणीला तिसर्‍यांना फ्रेंड रिक्वेस्ट पाठवणे बेकायदा समजले जाणार आहे. तक्रार दाखल केल्यानंतर संबंधितांवर गुन्हा दाखल होवू शकतो. माहिती तंत्रज्ञान कायदा अधिनियम 66 (अ) नुसार गुन्हेगारावर कारवाई केली जाणार आहे.