आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Facebook Gets Serious For Modi Visit Formal Dress Code For Staff

FB हेडक्वॉर्टरमध्ये मोदी: झुकरबर्ग असेल सुटमध्ये, महिलांच्या शॉर्ट ड्रेसवर बंदी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - फेसबुक हेडक्वॉर्टर्सला भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी भेट देणार आहेत. त्यांच्या स्वागतासाठी फेसबुकचे सीईओ मार्क झुकरबर्ग सुटमध्ये उपस्थित राहाणार आहेत. मार्क सर्वसाधारण टी-शर्ट, हुडी (टी-शर्ट जॅकेटसोबत घातली जाणारी अॅटॅच कॅप) जिन्स अशा पेहरावात ऑफिसमध्ये असतात, मात्र त्यांनी कंपनीच्या सर्व एम्प्लॉइजला 'ड्रेस कोड' फॉलो करण्याचे निर्देश दिले आहेत. अशी ही माहिती आहे, की कंपनीतील महिला कर्मचाऱ्यांना स्विव्हलेस आणि शॉर्टस असा पेहराव न करण्याच्या सूचना दिल्या आहेत. या कार्यक्रमाच्या वार्तांकनासाठी येणाऱ्या रिपोर्टर्सला फेसबुककडून पाठवण्यात आलेल्या पत्रकात 'ड्रेसकोड'चा उल्लेख करण्यात आला आहे.
फेसबुक ऑफिसमध्ये केव्हा पोहोचणार मोदी
पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिका दौऱ्यावर आहेत. ते रविवारी रात्री साडे आठ वाजता (भारतीय प्रमाण वेळेनूसार) मेन्लो पार्क येथील फेसबुक मुख्यालयाला भेट देणार आहेत.

आता पर्यंत 37 हजारांनी केले कॉमेंट
झुकरबर्गने 12 सप्टेंबर रोजी पंतप्रधान मोदी येणार असल्याची पोस्ट टाकली होती. त्यावेळी झुकरबर्गने लोकांना प्रश्न विचारण्याचे आवाहन केले होते. रविवारी दुपारी 1 पर्यंत या पोस्टवर 37 हजार कॉमेंट आल्या आहेत. त्यातील जास्तित जास्त कॉमेंट्स गंभीर आहेत तर काहींनी फनी प्रश्न विचारले. या पोस्टला 7 लाख 14 हजार लाइक्स आणि 41 हजार लोकांनी शेअर केले आहे.
झुकरबर्गचा ऑफिसमध्ये असतो मुक्त संचार
मार्क झुकरबर्ग फेसबुकचे सीईओ असले तरी ऑफिसमध्ये त्यांचा मुक्त वावर असतो. ते ग्रे टी-शर्ट, जिन्स आणि ब्लॅक हुडीमध्ये असतात. अनेक कार्यक्रमांमध्ये त्यांचा हाच पेहराव असतो. तुम्ही एकाच पद्धतीचे कपडे का वापरता असे झुकरबर्ग यांना एकदा छेडले असता त्यांनी सांगितले होते, 'मी माझ्या आयुष्यातून या सर्व गोष्टींना दूर ठेवतो. कारण मला अधिक चांगल्या प्रकारे काम करता आले पाहिजे.' पण त्यासोबत त्यांनी मान्य केले होते की एकाच रंगाचे त्यांच्याकडे खूप ड्रेस आहेत.