आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Facebook Give Eight Lack And Thirty Thousand An Indian Student

फेसबुककडून भारतीय विद्यार्थ्याला सव्वाआठ लाख रुपयांचे बक्षीस

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - फेसबुक या प्रसिद्ध सोशल नेटवर्किंग साइटवर कोणीही कोणाच्या खात्यावरील छायाचित्र सहजपणे काढून टाकू शकतो, हे एका भारतीय विद्यार्थ्याने सिद्ध करून दाखवले आहे. त्यामुळे फेसबुकने या विद्यार्थ्याला 8 लाख 25 हजार रुपयांचे बक्षीस देण्याचा निर्णय घेतला आहे.


अरुल कुमार या एकवीस वर्षीय विद्यार्थ्याने फेसबुकवरील कोणतेही छायाचित्र काढून टाकता येते, हे फेसबुकला सप्रमाण कळवले होते. मात्र, फेसबुकने अरुल कुमारचा दावा फेटाळून लावला होता. त्यानंतर अरुल कुमारने फेसबुकचे संस्थापक मार्क झुकरबर्ग यांच्याच प्रोफाइलवरील एक छायाचित्र काढून टाकले व त्याचा व्हिडिओ झुकरबर्गला पाठवून दिला. अरुल कुमारचा हा व्हिडिओ फेसबुकच्या अभियंत्यांनी पाहिला आणि आपली चूक त्यांच्या लक्षात आली. ती त्यांनी मान्यही केली. त्यामुळे अरुलच्या संशोधनाबद्दल फेसबुकने त्याला 8 लाख 25 हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे.

विशेष म्हणजे अरुल कुमार हा अभियंता किंवा सॉफ्टवेअर क्षेत्रातील तज्ज्ञ वगैरे नाही. अभियांत्रिकीच्या इलेक्ट्रॉनिक अँड कम्युनिकेशनमध्ये त्याने शिक्षण घेतले असून, चेन्नईत सध्या तो नोकरीच्या शोधात आहे. तमिळनाडूमध्ये एका छोट्याशा गावामध्ये त्याच्या वडिलांची टपरी आहे. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती नाजूक आहे. जानेवारीमध्ये लॅपटॉप खरेदी केल्यानंतर त्याने इंटरनेटवर संशोधन सुरू केले होते. फेसबुककडून मिळणा-या बक्षिसाच्या रकमेचा वापर कुटुंबीयांसाठीच करण्याचा अरुल कुमारचा मानस आहे.