आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Facebook News In Marathi, Modi, Kejriwal, Mamata, Lalu To Chat

Facebook वर भरणार मोदी, केजरीवाल, लालू, ममता यांचा जनता दरबार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी, आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल, तृणमुल कॉंग्रेस पक्षाच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव आणि लालू प्रसाद यादव यांच्यासोबत निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर सर्वसामान्य जनतेला चर्चा करता यावी यासाठी फेसबुक एक विशेष पेज लॉंच करणार आहे.
राजकीय पक्षांचे घोषणापत्र, त्यांच्या प्राथमिकता आणि त्यांनी देश कसा सांभाळावा यासंदर्भात जनतेला राजकीय नेत्यांशी लाईव्ह संवाद साधता यावा म्हणून फेसबुक ‘Facebook Talks Live’ पेज लॉंच करणार आहे. त्यामुळे या नेत्यांना फेसबुकवर ऑनलाइन जनतादरबार भरवता येईल. दरम्यान, युजर्सनी विचारलेले प्रश्न वरिष्ठ पत्रकार मधू त्रेहन फेसबुकच्या वतीने मॉडरेट करणार आहेत.
FacebookTalksLive च्या आगामी सेशनमध्ये नरेंद्र मोदी, अरविंद केजरीवाल, ममता बॅनर्जी, लालू प्रसाद यादव आणि अखिलेश यादव यांच्याशी संवाद साधता येणार आहे. त्यांच्या प्राथमिकता, अजेंडा आणि ते देश कसा सांभाळतील यावर प्रश्न विचारता येणार आहेत, असे फेसबुकच्या पब्लिक पॉलिसी डायरेक्टर (भारत आणि दक्षिण आशिया) अनखी दास यांनी सांगितले आहे.
3 मार्च ते 8 मार्च दरम्यान रात्री 8 ते 9 या वेळेत www.facebook.com/FacebookIndia या पेजवर प्रश्न विचारता येणार आहेत. 3 मार्च रोजी ठेवण्यात आलेल्या कार्यक्रमात नरेंद्र मोदी पहिले पाहुणे ठरतील. talks.facebooklive.com/ या अॅडरेसवर युजर्सना लाईव्ह संवादाचे अपडेट बघता येणार आहेत. काही खासगी वाहिन्यांवर या संवादाचे प्रक्षेपण करण्यात येणार असल्याचे समजते.