आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

100 वायफाय हॉटस्पॉटसाठी फेसबुकची मदत, दरवर्षी 5 लाख देणार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी डिजिटल इंडिया मोहिमेला चालना देण्यासाठी सोशल मीडिया कंपनी फेसबुक दक्षिण आणि पश्चिमेच्या ग्रामीण भागात १०० वायफाय हॉटस्पॉट स्थापन करण्यासाठी बीएसएनएलला मदत करणार आहे.

१०० वायफाय स्थापन करण्यासाठी फेसबुकने आमच्याशी भागीदारी केली अाहे. ते दरवर्षी प्रत्येक हॉटस्पॉटसाठी पाच लाख रुपये देणार आहेत,असे बीएसएनएलचे चेअरमन आणि व्यवस्थापकीय संचालक अनुपम श्रीवास्तव यांनी सांगितले. बीएसएनएलने निवडलेल्या क्वाड झेन संस्थेकडून त्याची स्थापना केली जाईल. क्वाड झेन आणि बीएसएनएलमधील हे रेव्हेन्यू शेअर मॉडेल आहे.

दत्तक गावांसाठी खासदारांचा रस : फेसबुकचे प्रवक्ते म्हणाले, सद्य:स्थितीत आम्ही यावर कोणतीही प्रतिक्रिया देऊ शकत नाहीत. फेसबुक आणि बीएसएनएलमधील करार तीन वर्षांचा असून त्यानंतर पुढील दोन वर्षे वाढ केली जाईल. सांसद आदर्श ग्राम योजनेतील गावाची निवड करण्यासाठी खासदारांनी या अभियानात रस दाखवला आहे. या योजनेत २०१६ पर्यंत दत्तक गाव आदर्श करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

स्थानिक विकास निधीचा वापर
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, रवीशंकर प्रसाद, नजमा हेपतुल्ला आणि लोकसभेच्या सभापती सुमित्रा महाजन यांनी वायफाय हॉटस्पॉटसाठी बीएसएनएलच्या बँडविड्थसाठी प्रायोजकत्व स्वीकारले आहे. स्थानिक विकास निधी अंतर्गत हॉटस्पॉट स्थापन करण्यासाठी बीएसएनएलने खासदारांशी संपर्क साधला. त्याला ५० खासदारांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे श्रीवास्तव यांनी सांगितले.

क्वाड झेन आणि ट्रायमॅक्सच्या भागीदारीतून स्थापन होणाऱ्या २५०० हॉटस्पॉटशिवाय प्रायोजित वायफाय स्पॉट निर्माण केले जातील. या कामासाठी लवकरच ऑप्टिकल फायबर कनेक्टिविटीचा विस्तार केला जात आहे. व्यावसायिक मॉडेलमध्ये क्वाड झेन २००० वायफाय हॉटस्पॉट स्थापन करणार आहे.
बातम्या आणखी आहेत...