आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फेसबुक, ट्विटर निवडणुकीत कमावणार 400 कोटी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - देशातील सार्वत्रिक निवडणुकीत प्रचार साहित्य विक्रेत्यांबरोबर सोशल मीडियाचीही चांदी होणार आहे. राजकीय पक्ष आणि नेते सोशल मीडियाचा मोठ्या प्रमाणात वापर करत आहेत. असोचेमच्या एका अहवालानुसार, सोशल मीडिया प्रचाराच्या माध्यमातून जवळपास 400 कोटी रुपये कमाई करण्याचा अंदाज आहे. राजकीय पक्षही निवडणूक काळात सोशल मीडियावर आपले म्हणणे मांडण्यास पसंती देतात. निवडणूक आयोगाच्या एका अंदाजानुसार 80 कोटी मतदारांपैकी 60 ते 70 टक्के अद्याप इंटरनेटच्या कक्षेत नाहीत. असे असले तरी राजकीय पक्ष डिजिटल मार्केटिंगवर भर देत आहेत. असोचेमच्या अहवालानुसार, गुगल, ट्विटर आणि फेसबुकचे उत्पन्न लोकसभा निवडणुकीमुळे खूप वाढले आहे. विविध राजकीय पक्ष 2009 च्या तुलनेत सोशल मीडियावर जास्त खर्च करत आहेत.