आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ट्विटरवर लोक उडवत आहेत कुमार विश्वास यांची खिल्ली

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - सोशल वेबसाइट्सवर आम आदमी पार्टीला (आप) मोठी प्रसिद्धी मिळालेली आहे. तर, आता दुसरीकडे 'आप'चे नेते कुमार विश्वास यांची सोशल मीडियावर खिल्ली उडवली जात आहे. जनलोकपाल आंदोलन आणि त्यानंतर दिल्ली विधानसभा निवडणूकीत सोशल मीडियावर लाखो लोकांनी केजरीवाल यांना पाठींबा दर्शवलेला होता. दिल्लीमध्ये सरकार स्थापन करावे किंवा नाही याचाही निर्णय टीम केजरीवालने सोशल मीडिया आणि एसएमएसच्या माध्यमातून घेतला आहे. तेव्हाही सोशल मीडियातून केजरीवालांबद्दल नाराजीचा सूर उमटला होता.
रविवारी मोठ्या 'आप'चे नेते कुमार विश्वास यांनी काँग्रेस आणि भारतीय जनता पक्षाला लोकसभेचे आव्हान दिले आहे. त्यांनी अमेठीमधून निवडणूक लढविण्याची तयारी दर्शवली आहे. त्याच बरोबर कुमार विश्वास यांनी काँग्रेसवर घराणेशाहीचा आरोप करणारे नरेंद्र मोदी यांना अमेठीतून राहुल गांधींच्या विरोधात निवडणूक का लढत नाही, असा सवाल उपस्थित केला आहे. यानंतर ट्विटरवर कुमार विश्वास यांच्या नावाने टिवटिवाट सुरू झाला आहे. आज दिवसभरात ते ट्विटरच्या टॉप टेन ट्रेंड्समध्ये आहेत. आज (सोमवार) त्यांनी पक्षाकडे अमेठीतून उमेदवारीची मागणी केली आहे.

पुढील स्लाइडमध्ये पाहा, कशी उडवली कुमार विश्वास यांची खिल्ली..