आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Faces May Be Included In Arvind Kejriwal Ministry

'आप'च्‍या या नेत्‍यांना मिळू शकते मंत्रिमंडळातील टीम केजरीवालमध्‍ये स्‍थान

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आम आदमी पार्टीचे (आप) संयोजक अरविंद केजरीवाल दिल्‍लीचे मुख्‍यमंत्री म्‍हणून शपथ घेणार आहेत. या पक्षाची आणि केजरीवाल यांची पहिलीच निवडणूक होती. त्‍यात त्‍यांनी कॉंग्रेसला सत्तेवरुन खाली खेचले. स्‍वतः केजरीवाल यांनी दिल्‍लीच्‍या मुख्‍यमंत्रीपदावर 15 वर्षांपासून विराजमान असलेल्‍या शीला दीक्षित यांचा पराभव केला. आता दिल्‍लीत 'आप'चे सरकार स्‍थापन होणार आहे. त्‍यासाठी 'आप'च्‍या आमदारांचे प्रशिक्षण सुरु करण्‍यात आले आहे. त्‍यांरा राजकीय डावपेच शिकविण्‍यात येत आहेत. दिल्‍लीच्‍या सरकारची सुत्रे केजरीवाल यांच्‍या हातात राहणार आहेत. त्‍यांच्‍या टीम मध्‍ये कोण राहणार, याकडे जनतेचे लक्ष लागले आहे.

दिल्‍लीत विधानसभेच्‍या 70 जागा आहेत. त्‍यावरुन मंत्रिमंडळात 10 सदस्‍य राहू शकतात. त्‍यात म‍नीष सिसोदिया, सौरभ भारद्वाज, विनोद कुमार बिन्‍नी आणि सोमनाथ भारती यांचा समावेश निश्चित मानला जात आहे. तीन महिला आमदारांपैकी एकीचाही समावेश निश्चित आहे. ते नाव राखी बिर्ला यांचे असू शकते.

मंत्रिमंडळाला अंतिम स्‍वरुप देण्‍यात आले आहे. त्‍यावर एक थोडक्‍यात नजर टाकू या... क्लिक करा पुढील स्‍लाईड्सवर...