आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Delhi Assembly : हे असतील अरविंद केजरीवाल यांच्या मंत्रिमंडळातील प्रमुख चेहरे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - मतदारांनी दिलेल्या पूर्ण बहुमताच्या कौलानंतर आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल त्यांच्या सहा सहकाऱ्यांसह रामलीला मैदानावर शपथ घेणार आहेत. केजरीवाल यांच्या मंत्रिमंडळात सहभागी होणाऱ्या या सहा जणांमध्ये गेल्यावेळी मंत्री असलेल्या केवळ दोघांचा समावेश आहे. त्यामुळे केजरीवालांचे मंत्रिमंडळ नव्या चेहऱ्यांचे असण्याची शक्यता आहे.

केजरीवाल यांच्या मंत्रिमंडळात मनीष सिसोदिया यांनी उपमुख्यमंत्रीपद दिले जाण्याची शक्यता आहे. सिसोदिया यांच्याबरोबरच कपिल मिश्रा, सत्येंद्रकुमार जैन, संदीप कुमार, जितेंद्र तोमर, इम्रान हुसेन यांचा समावेश असणार आहे. जाणून घेऊयात या चेहऱ्यांबाबत...

मनीष सिसोदिया
आपच्या संस्थापकांपैकी एक असलेले मनीष सिसोदिया हे आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांचे विश्वासू आणि नीकटवर्तीय आहेत. आपच्या 49 दिवसांच्या सरकारमध्ये त्यांच्याकडे शिक्षण, सार्वजनिक बांधकाम, नगरविकास आणि स्थानिक स्वराज्य संस्था यासह जमीन व इमारती अशी महत्त्वाची खाती होती. सिसोदिया हे मूळचे सामाजिक कार्यकर्ते आणि पत्रकार आहेत. त्यांना उपमुख्यमंत्रीपद दिले जाण्याचीही शक्यता आहे.

सामाजिक कार्यात येण्याआधी सिसोदिया यांनी झी न्यूज आणि ऑल इंडिया रेडियोमध्ये का केलेले आहे. माहितीचा अधिकार कायद्यासाठी झालेल्या आंदोलनात त्यांचा सक्रिय सहभाग होता. या कायद्याचा मसुदा तयार करण्यात त्यांचे योगदान आहे. पब्लिक कॉज िरसर्च फाऊंडेशन या सामाजिक संस्थेच्या सस्थापकांपैकी ते एक आहेत. जन लोकपाल विधेयकासाठी करण्यात आलेल्या आंदोलनातही त्यांची महत्त्वाची भूमिका होती. त्यांच्या कबीर या सामाजिक संस्थेसाठी परदेशातून आलेला निधी खासगी कामासाठी वापरल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे.
पुढील स्लाइडवर वाचा, इतर उमेदवारांविषयी...