आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बनावट कीटकनाशकांचा वेढा, अन्नधान्य उत्पन्नात होऊ शकते घट

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांच्या मदतीचे कितीही दावे केले जात असले तरीही वस्तुस्थिती अगदी वेगळी आहे. शेतकऱ्यांना पेरणीसाठी योग्य प्रमाणात बियाणे पुरेशा प्रमाणात मिळत नाही ना कीटकनाशके. छत्तीसगडसारख्या कृषिप्रधान राज्यातील शेतकरीवर्ग खरेदी करत असलेले कीटकनाशके एकतर बनावट निघतात किंवा भेसळयुक्त निष्पन्न होत आहेत.
यामुळे देशाच्या एकूणच अन्नधान्य उत्पादनावर विपरीत परिणाम दिसून येत आहे. यंदाच्या चालू वर्षांत सुमारे साडेदहा लाख टन खाद्यान्न उत्पादन प्रभावित होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दरम्यान, टाटा स्ट्रेटजिक मॅनेजमेंट ग्रुपच्या वतीने प्रथमच याविषयी तपासणी करण्यात आली. अहवालात काही खळबळजनक खुलासे करण्यात आले आहेत.
मॅनेजमेंट ग्रुपच्या एका अधिकाऱ्याचे म्हणण्यानुसार, राज्य शासनाच्या वतीने लवकरच याला थांबवण्यासाठी काही कठोर पावले न उचलल्या गेल्यास स्थिती हाताबाहेर जाईल. त्यामुळे बनावट आणि भेसळयुक्त कीटकनाशकांवर नियंत्रण आणण्याची, त्यासाठी कठीण कायदे करण्याची आज आवश्यकता आहे. बनावट कीटकनाशकांच्या समस्येने केवळ अन्नधान्य उत्पादनच नव्हे तर संपूर्ण देशाच्या जीडीपीवर परिणाम होऊन कृषी क्षेत्राच्या एकूणच योगदानावर त्याचा परिणाम होईल.
अहवालानुसार, वर्ष २००१-०२ मध्ये कृषी क्षेत्राचा जीडीपीमध्ये १९.३४ टक्के योगदान होते ते २०१३-१४ मध्ये घटून १५.७९ टक्के झाले. तसे पाहता जीडीपीच्या योगदानातील घसरत्या टक्केवारीचे कारण अर्थव्यवस्थेमध्ये संरचनात्मक बदल आणि निर्माण व सेवा क्षेत्रातील विस्तार समजले जात आहे. परंतु, या प्रवृत्तीला चिंताजनक समजले जात असून, ज्यामुळे भविष्यात कृषी क्षेत्रावर विपरीत परिणाम होऊ शकतो. विश्वात अन्नधान्य निर्यातीत अग्रकमावर असलेल्या भारताची स्थिती यामुळे डगमळू शकते. कारण अन्य देशांमधून अन्नधान्याची अस्वीकृती होण्याचे प्रमाण वाढू शकते. उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, बिहार, झारखंड, राज्यांना बनावट व भेसळयुक्त कीटकनाशकांनी विळखा घातला आहे.