आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • False Information In Affidavit, Case Of Irani Security

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शपथपत्रात चुकीची माहिती, इराणींवरील खटला सुरक्षित

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री स्मृती इराणी यांनी निवडणूक आयोगाला दिलेल्या शपथपत्रात शैक्षणिक पात्रताविषयक चुकीची माहिती दिल्याचा आरोप आहे. या खटल्याचा निकाल दिल्लीतील एका न्यायालयाने २४ जूनपर्यंत सुरक्षित ठेवला आहे.

याप्रकरणी महानगर दंडाधिकारी आकाश जैन यांनी फिर्यादी अहमद खान यांचे वकील के. के. मनन यांची बाजू ऐकली. स्मृती यांनी २००४ च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान सांगितले होते की त्यांनी १९९६ मध्ये दिल्ली विद्यापीठातून बीएची पदवी प्राप्त केली. जुलै २०११ मध्ये गुजरातमधून राज्यसभेसाठी निवडणूक लढवताना आणि २०१४ मध्ये लोकसभा निवडणुकीदरम्यान सांगितले की दिल्ली विद्यापीठातून बीकॉम प्रथम वर्षापर्यंत शिक्षण घेतल्याचे त्यांनी सांगितले. मनन यांनी आपली बाजू मांडताना ही माहिती दिली. यापूर्वी १४ मे रोजी खान यांना १ हजारांचा दंड सुनावला.