आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Family Members Mourn Demise Of Lt Col Niranjan As Mortal Remains Arrive At Bengaluru Residence

शहीद पित्‍याला मुलीने दिला अखेरचा निरोप, मुलींसाठीही लागले जिंदाबादचे नारे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शहीद फतेह सिंह यांच्‍या मुलीने त्‍यांना खांदा दिला. - Divya Marathi
शहीद फतेह सिंह यांच्‍या मुलीने त्‍यांना खांदा दिला.
नवी दिल्ली / बंगळुरु - पठाणकोट विमानतळावर असलेला बॉम्‍ब निकामी करताना ले. कर्नल नीरंजन ई. कुमार शहीद झाले. सोमवारी त्‍यांचे पार्थिव बेंगलुरु येथील त्‍यांच्‍या निवासस्‍थानी पोहोचले. यावेळी त्‍यांची 2 वर्षांची मुलगी विस्मयासुद्धा उपस्‍थ‍ित आहे. दुसरीकडे गुरदासपूरमध्‍ये सुबेदार मेजर फतेहसिंग यांना त्‍यांच्‍या मुलीने खांदा दिला. यावेळी ‘शहीद की बेटी जिंदाबाद’ चे नारे लागली. अंबालामध्‍येही कमांडो गुरसेवक सिंह यांना अखेरची सलामी दिली. त्‍यांचे दीडच महिन्‍यापूर्वी लग्‍न झाले होते.

कसे शहीद झाले जवान ?

1. शहीद गुरसेवक
- एअरफोर्सच्या गरुड कमांडो फोर्सचे सदस्य होते. शनिवारी पाहाटे दहशतवाद्यांनी पठाणकोट एअरबेसवर हल्ला केला, तेव्हा गुरसेवक एअरफोर्समध्ये दुसऱ्या फळीच्या सुरक्षेवर तैनात होते.
- त्यांना सुरुवातीच्या फायरिंगमध्येच गोळी लागली. तरीही ते लढत होते. गंभीर जखमी अवस्थेतही त्यांनी मोर्चा सांभाळला. त्यांना फार गोळ्या लागल्यामुळे ते शहीद झाले.
- गुरसेवक यांचा दीड महिन्यांपूर्वी जसप्रीत कौर यांच्यासोबत विवाह झाला होता.
- गुरसेवक यांचे वडील म्हणाले, देशासाठी एक मुलगा शहीद झाला म्हणून काय होते, अजून दुसरा मुलगा हरदीपसिंग लष्करात आहे.
-------------------

2. शहीद नीरंजन
- एनएसजीच्या बॉम्ब डिफ्यूजल स्क्वॉडचे प्रमुख होते.
- ऑपरेशन दरम्यान दहशतवाद्यांच्या शरीरावर लावलेले एक्सप्लोसिव्ह डिफ्यूज करताना स्फोट झाला.
- त्यात लेफ्टनंट कर्नल निरंजन शहीद झाले.
- त्‍यांनी दहशतवाद्याच्‍या शरिराला लावलेल्‍या बॉम्‍बला स्‍पर्श करताच स्‍फोट झाला.
- 35 वर्षीय नीरंजन यांचा जन्‍म केरळमध्‍ये झाला होता. नंतर त्‍यांचे पूर्ण कुटुंब बेंगलुरुला स्‍थायिक झाले.
- दीड वर्षांपूर्वी त्‍यांना आर्मीच्‍या नॅशनल सिक्युरिटी गार्ड (NSG) मध्‍ये नियुक्‍ती मिळाली होती.
-------------------

3. शहीद फतेह सिंह
- 2009 मध्‍ये निवृत्‍त झालेले फतेह हे येथे तीन वर्षांपर्यंत आर्मी वॉर कॉलेजमध्‍ये प्लाटून कमांडर होते.
- त्‍यांच्‍या पार्थिवाला त्‍यांची 25 वर्षीय मुलगी मधू हिने खांदा दिला.
- इंग्रजीची शिक्षिका असलेल्‍या मधूने म्‍हटले, '' फायरिंगचा आवाज येताच विमानतळाच्‍या आत असलेल्‍या क्वॉर्टरमधून माझे वडील गणवेश घालून बाहेर पडले आणि दहशतवाद्यांशी लढले.
- माझे वडील बाहेर दहशतवाद्यांशी लढत होते. आत गोळीबारीचा आवाज येत होता. काही गोळ्या खिडकीवरही लागल्‍या. याच दरम्‍यान ते शहीद झाले.
- आम्‍ही दीड तास बेड खाली लपून होते. खाली थंडगार फरशी होती. परंतु, बेडवर जाण्‍याचे धाडस झाले नाही.
UPDATES
- बंगळुरू येथे एनएसजीचे लेफ्टनंट कर्नल निरंजन यांचे पार्थीव पोहोचले. त्यांची पत्नी डॉ. राधिका आणि दोन वर्षांची मुलगी विस्मया अंत्यदर्शनासाठी पोहोचल्या. सकाळी शाळेतील मुलांनी निरंजनकुमार यांना श्रद्धांजली अर्पण केली.
- गरनाला येथे गुरसेवक यांना एअरफोर्स जवानांनी अखेरची सलामी दिली. येथेच त्यांच्यावर अत्यंसस्कार करण्यात आले.
- हरियाणाचे मंत्री अनिल वीज आणि कॅप्टन अभिमन्यु देखिल उपस्थित होते.
- हरियाणाचे मुख्यमंत्री खट्टर यांनी 20 लाखांच्या आर्थिक मदतीची घोषणा केली.
- 18 नोव्हेंबर रोजी गुरसेवक यांचे लग्न झाले होते.
शहीदाचे कुटुंबिय काय म्हणाले
- लेफ्टनंट कर्नल निरंजन यांच्या वीरगतीवर त्यांची बहिण म्हणाली, निरंजनने अर्जुनाप्रमाणे काम केले आहे. त्यांनी आपल्या कर्मभूमीसाठी प्राणार्पण केले आहे.
- मुलाबद्दल निरंजन यांचे पिता म्हणाले, त्याला सुरुवातीपासूनच आर्मीची ओढ होती.
- केरळच्या पलक्कड जिल्ह्यातील इलंबसेरी गावात जन्मलेले निरंजन यांचे लहान वयातच मातृछत्र हरवले होते.
- ते बंगळुरु येथे दोन भाऊ आणि एका बहिणीसोबत शिक्षण घेतले.
- एनएसजीमध्ये जाण्याआधी ते लष्कराच्या मद्रास इंजिनिअरिंग ग्रुपमध्ये नियुक्तीवर होते.

सप्टेंबरमध्ये गेले होते कुटुंबियांच्या भेटीला
- तीन वर्षांपूर्वी निरंजन यांचा विवाह येथील डॉक्टर के.जी.राधिका यांच्यासोबत झाला होता.
- सप्टेंबर 2015 मध्ये ते कुटुंबियांच्या भेटीसाठी गेले होते. त्यांना दोन वर्षांची मुलगी आहे, तिचे नाव विस्मया आहे.
- केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह आणि मुख्यमंत्री ओमेन चंदी यांनी ट्विट करुन श्रद्धांजली दिली.
पुढील स्लाइडमध्ये, पार्थिव पोहोचले बंगळुरुला, कुटुंबीय गहिवरले