आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Faridabad Commissioner Was Given Guarantee For Security Of Dalit Family

दोन मुलांना जिवंत जाळले, आयुक्तांच्या आश्वसनानंतर गावात परतले होते दलित कुटुंब

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मोठ्यांच्या पूर्ववैमन्यस्यात बळी गेलेले हेच दोन चिमुरडे - दिव्या आणि वैभव - Divya Marathi
मोठ्यांच्या पूर्ववैमन्यस्यात बळी गेलेले हेच दोन चिमुरडे - दिव्या आणि वैभव
फरिदाबाद/ नवी दिल्ली - राजधानी दिल्लीला लागूनच असलेल्या एका खेड्यात झोपेत असलेल्या दलित कुटुंबाच्या घरात घुसून त्यांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न झाला. पूर्ववैमनस्यातून जिवंत जाळल्याची धक्कादायक घटनेत दोन चिमुरड्यांचा मृत्यू झाला, तर गंभीर भाजलेले त्यांचे आई-वडील मृत्यूशी झुंज देत आहेत. पीडित जितेंद्रला पोलिस आयुक्तांनी गावातील वातावरण निवळले असून सुरक्षेचे लिखित आश्वासन दिले होते. त्यानंतरही ही घटना घडली आहे.

दिल्लीजवळच्या सोनपेठ गावात सोमवारी रात्री दोनच्या सुमारास दलित कुटुंबाच्या घरात घुसून त्यांच्यावर पेट्रोल टाकून पेटवून देण्याची घटना घडली. हे गाव हरियाणाच्या फरिदाबाद जिल्ह्यात येते. या जाळपोळीत अडीच वर्षांचा वैभव, त्याची 11 महिन्यांची बहीण दिव्या होरपळून जागीच ठार झाले. त्यांची आई रेखा 70 टक्के भाजली.

काय झाले होते मागील वर्षी
मागील वर्षी 5 ऑक्टोबर 2014 रोजी मोबाइलवरुन गावातील वाद झाला होता. या घटनेत सवर्ण समाजाच्या तीन युवकांची हत्या करण्यात आली होती. तेव्हा दलितांवर हत्येचा आरोप ठेवण्यात आला होता. पोलिसांनी या प्रकरणी 11जणांना अटक केली होती. गावातील गुंड प्रवृत्तीचे लोक बदल्याच्या भावनेने सर्वच दलितांना त्रास देतील या भीतीने त्यांनी गाव सोडले होते. यात जितेंद्रचे कुटुंब देखिल होते. हे प्रकरण एससी-एसटी आयोगामध्ये देखिल गेले. आयोगाने फरिदाबादच्या पोलिस आयुक्तांकडे पीडित कुटुंबांच्या सुरक्षेबाबत विचारणा केली. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये पोलिस आयुक्तांनी लिखित आश्वासन दिले, की जितेंद्रच्या घराजवळ एक पोलिस जिप्सी, अर्धा डझन शस्त्रसज्ज पोलिस कर्मचारी आणि दोन बाइकस्वार जवान तैनात राहातील. पोलिस निरीक्षक या सुरक्षेवर स्वतः लक्ष ठेवून असतील. या आश्वासनानंतर जितेंद्र आणि त्याचे कुटुंब या वर्षी जानेवारीमध्ये गावात परत आले होते.
मंगळवारच्या रात्री काय झाले
सोनपेठ गावात मंगळवार रात्री काही लोक दलित समाजाच्या जितेंद्रच्या घरात घुसले. त्यांनी जितेंद्रच्या पत्नी आणि मुलांसह त्याच्या अंगावर पेट्रोल टाकले आणि पेटवून दिले. त्यानंतर घराचे दार बाहेरून बंद करुन पळून गेले. या घटनेत जितेंद्रची दोन मुले जागेवरच ठार झाली. तर दोघे पती-पत्नी गंभीर जखमी झाले. जितेंद्रच्या पत्नीवर दिल्लीतील सफदरजंग हॉस्पिटलमध्ये आयसीयूमध्ये उपचार सुरु आहेत.
जितेंद्रने सांगितली आपबीती
आपल्या दोन चिमुरड्यांना डोळ्या देखत जिवंत जळताना पाहणाऱ्या जितेंद्रने सांगितले, "पत्नी रेखा आणि दोन्ही मुलांसोबत मी गाढ झोपेत होतो. रात्री जवळपास आडीच वाजता कोणीतरी खिडकीतून पेट्रोल फेकले. पेट्रोल हातावर पडल्याने माझी झोपमोड झाली. मी पत्नी आणि मुलांना उठवले आणि बाहेर जाण्याचा प्रयत्न केला, तेव्हाच एक पेटती माचिसची काडी घरात पडली आणि घरातील वस्तूंनी पेट घेतला. घराचा दरवाजा बाहेरून बंद केलेला होता आणि आतमध्ये सगळीकडे आग भडकलेली. आम्ही मदतीसाठी आरडाओरड केली पण गावात जागरणाचा कार्यक्रम सुरु होता त्यात आमचा आवाज कोणापर्यंत पोहोचला नाही. दरम्यान जागरणात बसलेली एक मुलगी शॉल आणण्यासाठी तिच्या घरी चालली होती. तिने आमच्या घराला लागलेली आग पाहिली आणि लोकांना बोलावले. तेव्हा गावातील सर्वांना कळाले आणि आम्हाला बाहेर काढण्यात आले."
काय कारवाई झाली
जितेंद्रने पोलिसांना सांगितले, उच्च जातीच्या काही लोकांनी आमच्या घरावर हल्ला केला. पोलिसांनी या प्रकरणी 11 जणांविरोधात गुन्हा दाखल करुन तीन जणांना ताब्यात घेतले आहे. सुरक्षेत निष्काळजीपणा केल्याच्या आरोपात बल्लभगड पोलिस स्टेशनचे प्रभारी अनिलकुमारसह आठ पोलिसांना निलंबित करण्यात आले आहे. गृहमंत्री राजनाथसिंह यांनी या घटनेवर चिंता व्यक्त केली आहे तर, मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी अहवाल मागवला आहे. मुख्यमंत्र्यांनी पीडित कुटुंबाला 10 लाख रुपये मदतीची घोषणा केली आहे.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, पीडित कुटुंबाचा आक्रोश आणि आग लावण्यात आली ती रुम